BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*जुनिकामठी मनसे शाखेचे उद्घाटन*

Summary

नागपूर कन्हान पासुन ९ कि मी लांब पश्चिमेस पारशिवनी तालुक्यातील जुनीकामठी गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन आणि मनसे गाव शाखा फलका चे अनावरण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. नुकतेच जुनिकामठी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या […]

नागपूर कन्हान पासुन ९ कि मी लांब पश्चिमेस पारशिवनी तालुक्यातील जुनीकामठी गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन आणि मनसे गाव शाखा फलका चे अनावरण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
नुकतेच जुनिकामठी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते आणि पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले च्या पुढा काराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुनिकामठी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनसे जिल्हा सचिव मनोज गुप्ता, मनविसे चे नागपूर शहर अध्यक्ष आदित्य दुरुगकर, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र पांडे, विक्की नांदूरक र, रामभाऊ,बावणे, दत्ता साकुलकर, निखिल झाडे, हाफिज अन्सारी, शैलेश गुप्ता, सागर गायकवाड आदी च्या प्रमुख उपस्थितीत मनसे जुनिकामठी शाखा अध्य क्ष म्हणुन उकुंडराव देवगडे यांची नियुक्ती करण्यात आली. गावाच्या प्रवेश व्दारा जवळ मनसे शाखा जुनि कामठी फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उकुंडराव देवगडे, राम जुनघरे, मंगेश कावळे, योगराज उके आदी सह कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *