खिशात नाही दमडी अन बाजार फिरते कोंबडी; अर्थसंकल्पावर विजय वड्डेटीवार यांची टीका…
चंद्रपुर : ज्या देशात वित्तीय तूट साडेनऊ टक्क्यांवर पोचली, तर जीडीपी उणे सात आहे, तिथं हा अर्थसंकल्प म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. वांझोट्या म्हशीला चार पिल्लं असल्यासारखा हा प्रकार आहे. सारं काही विकण्याचा सपाटा लावलाय. आता या देशाला कुणी वाचवू शकत नाही. अशा शब्दात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.
निर्मला सीतारामन यांनी काहीवेळा पूर्वी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर वड्डेटीवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, आता राम मंदिर बांधून श्रीरामाला देश वाचवण्याचे साकडे मोदी घालणार आहेत, असं यात दिसतं. एकूणच काय तर देशातील लोकांच्या अपेक्षांना पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे.
रोजगार गेला, उद्योग बुडाले. याला चालना देण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. शेतकऱ्यांना दीडपट भाव किंवा हमीभाव देण्याची भाषा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खिशात नाही दमडी आणि बाजार फिरते शेंबडी, असा टोला वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर