खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी १५.५५ कोटी निधी मंजूर….. नगरविकास मंत्री यांनी नगरविकास खात्यातून लेखाशीर्षअंतर्गत क.डों.म. पालिकेस केला निधी मंजूर…
Summary
डोंबिवली : खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुलभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी लेखाशीर्षअंतर्गत (२२१७ ०९१३) सुमारे १५.५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामे लक्षात घेता खासदार डॉ. शिंदे हे नेहमीच तत्पर असतात. […]
डोंबिवली : खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुलभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी लेखाशीर्षअंतर्गत (२२१७ ०९१३) सुमारे १५.५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामे लक्षात घेता खासदार डॉ. शिंदे हे नेहमीच तत्पर असतात. यासाठीच त्यांनी महापालिकेतील मुलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करत विविध विकासकामे मंजूर करून घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ते आणि पाणीसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. परंतु, महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे या शहरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे नगरविकास विभागातून माध्यमातून व्हावीत, यासाठी खासदार डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. खा. डॉ. शिंदे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून दि. ०९ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र शासनाकडून कल्याण डोंबिवलीसाठी १५.५५ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील विकासकामे थांबू नये यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी शासन दरबारी रु. १५.५५ कोटीची मागणी केली होती. क.डों. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या निधीतून मुलभूत सुविधा मिळण्यास मदत होईल. तसेच येणाऱ्या काळातही विविध योजनाअंतर्गत महापालिका क्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणण्यात येईल, त्यासाठी शासनाकडे अनेक प्रस्ताव सादर केले असून त्यासाठी सुद्धा लवकरच निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती खा.डॉ. शिंदे यांनी दिली.
निधीतून ही कामे लागणार मार्गी: शहरांतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण, नवीन जल वाहिन्या, चौकाचे सुशोभीकरण, पथदिवे व असे अनेक विकासकामे सदर निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवाळी निम्मित कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अनोखी दिवाळी भेट दिली आहे.
जगदीश जावळे
न्यूज रिपोर्टर
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य