कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधीचे साहित्य मोफत द्यावे…. डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या पूर्व विभागाचे उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांनी आयुक्तांकडे मागणी…
Summary
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधीचे साहित्य मोफत द्यावे अशी मागणी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या पूर्व विभागाचे उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत ही मागणी केली.कल्याण […]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधीचे साहित्य मोफत द्यावे अशी मागणी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या पूर्व विभागाचे उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत ही मागणी केली.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 1995 च्या महासभेत तत्कालीन महापौरांनी अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य मोफत देण्याबाबत सभागृहात ठराव मांडला होता. ज्याला सभागृहात सर्वानुमते मंजुरी मिळाल्याचे प्रणव केणे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.मात्र आद्यप तरी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय लवकरात लवकर लागू करावा आणि केडीएमसीच्या हद्दीतील सर्व स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य मोफत द्यावे अशी मागणी प्रणव केणे यांनी केली आहे. यावेळी युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा माजी अध्यक्ष राहुल केणे हेदेखील उपस्थित होते.
जगदीश जावळे
न्यूज रिपोर्टर
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य