कन्हान पोलीसानी अवैध रेती चोरीचे दोन ट्रॅक्टर पकडले. दोन ट्रॅक्टर ट्राली, २ ब्रॉस रेती सह १० लाख ६ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.
नागपूर (कन्हान) : पोलीसानी पेंच नदीची अवैध रेती चोरून नेताना वाघोली शिवारात दोनदा कारवाई करून दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, दोन ब्रॉस रेती सह १० लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला.
शनिवार (दि. ३१) ला सकाळी ९ वाजता दरम्यान कन्हान पोलीसानी पेट्रोलिंग करित असताना मिळाले ल्या गुप्त माहीतीवरून वाघोली शिवारात पेंच नदीती ल घाटरोहणा-एंसबा घाटातील रेती चोरून नेताना सो नालिका ट्रॅक्टर क्र एम एच बी ई ५८६८, बिना नंबर ट्रॉली मध्ये १ ब्रॉस रेती चोरून नेताना पकडुन ५ लाख ३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी संबा पुडलिक वडे रा. कुंभापुर यांचे विरूध्द अप क्र ४०४ /२० कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा नोंद केला. तसेच १०.३० वाजता दरम्यान दुस-या बिना नंबर च्या ट्रॅक्टर ट्रॉलीत त्याच घाटातील १ ब्रॉस रेती चोरून नेताना वाघोली शिवारात कन्हान पोलीसानी ट्रॅक्टर, ट्रॉली सह १ ब्रॉस रेती किंमत ५ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी १) आशिष मोतीराम ठाकरे रा. नरसाळा व २) दामोधर प्रभुजी ठाकरे रा सावरगाव यांचे विरूध्द अप क्र ४०५/२० कलम३७९, १०९ भा दंवी नुसार गुन्हा नोंद केला. या दोन कारवाई कन्हान पोलीसानी करून दोन ट्रॅक्टर, ट्रॉली सह २ ब्रॉस रेती किंंमत १० लाख ६ हजार रूपयाचा मुद्देमाल पकडुन जप्त करित तीन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला. कन्हान पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरूण त्रिपाठी यां च्या मार्गदर्शनात नापोशि कृणाल पारधी, राजेंद्र गोतम, राहुल रंगारी, सु़धिर चव्हाण, संजय बरोद्रिया शरद गिते आदीने कारवाई यशस्वी केली.
दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी
९५०३३०९६७६