महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय संविधान दिनानिमित्त शुभेच्छा

Summary

मुंबई, दि.२६ : भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात श्री.अजित पवार म्हणतात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४९ मध्ये आजच्याच दिवशी देशाला अर्पण केलेल्या भारतीय संविधानाने देशातील प्रत्येकाला मान, सन्मान व समानतेचा हक्क दिला. […]

मुंबई, दि.२६ : भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात श्री.अजित पवार म्हणतात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४९ मध्ये आजच्याच दिवशी देशाला अर्पण केलेल्या भारतीय संविधानाने देशातील प्रत्येकाला मान, सन्मान व समानतेचा हक्क दिला. भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधूतेच्या विचारांचा अवलंब करून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखणे. देशाला एकजूट ठेवणारी सर्वधर्मसमभावाची भावना अधिक दृढ करणे हे आपले  नैतिक व राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधान तसेच लोकशाही मूल्यांची  जपणूक करीत त्यांचे महत्व भावी  पिढीपर्यंत पोहचवण्याचा, देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्याचा पुनर्निर्धार आजच्या संविधान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करूया.. महामानव डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन. संविधान दिनाच्या सर्वाना शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *