उत्तम गलवा येथील अपघातातील जखमी कामगाराची पालकमंत्री सुनील केदार यांनी केली चौकशी
वर्धा,दि 6 जिमाका ) 3 फेब्रुवारीला उत्तम गलवा मेटॅलिक्स कंपनीतील फरनेसमध्ये गरम राख बाहेर पडल्याने झालेल्या अपघातात 38 कामगार जखमी झाले होते. अपघातातील जखमी कामगारांना सावंगी येथील रुग्णालय व सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कामगारापैकी सध्या सावंगी मेघे येथे 8 व सेवाग्राम येथे 4 कामगारावर औषधोपचार सुरु आहे. या कामगाराची राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सावंगी व सेवाग्राम येथील रुग्णालयात जावून प्रकृतीचे चौकशी केली.
यावेळी सेवाग्राम येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार ,कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. दिलीप गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस तसेच सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात प्रशासकिय अधिकारी अभ्युदय मेघे, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. महाकाळकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491