इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चारचाकी व दुचाकी बंद वाहनांना “धक्का मारो” आंदोलन
Summary
चंद्रपूर:- देशात उच्चांक गाठलेल्या इंधन दरवाढी च्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात चारचाकी बंद वाहनाला रस्सीने खेचून जिल्हाधिकारी कार्यालयावर अभिनव पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने पेट्रोलवर ५० टक्के कर व […]
चंद्रपूर:- देशात उच्चांक गाठलेल्या इंधन दरवाढी च्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात चारचाकी बंद वाहनाला रस्सीने खेचून जिल्हाधिकारी कार्यालयावर अभिनव पद्धतीने मोर्चा काढण्यात आला.
अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने पेट्रोलवर ५० टक्के कर व डिझेलवर ४० टक्के कर लावल्यामुळे आजपर्यंतचा इंधन दरवाढीचा हा उच्चांक आहे. कोरोना मुळे आधीच महागाईने होरपळणाऱयांना पुन्हा दररोज दरवाढीचा दणका मिळत आहे.
भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल-डिझेलवर भारताइतका कर आकारला जात नसल्यामुळे तिथे पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. व म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या आंदोलनात सहभागी कार्यकर्ते व पदाधिकारयांनी बंद चारचाकी व दुचाकी वाहनांना धक्का देत केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर रा.यु.काँ. जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा नेला.
सदर आंदोलनात शहर अध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनिल काळे, रा.यु.काँ. शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, माजी सरपंच अमोल ठाकरे, सोशल मीडिया नितीन पिपळशेंडे, पंचायत समिती पंकज ढेंगारे, प्रदेश सचिव गणेश गिरधर, अभिनव देशपांडे, संजय ठाकूर, अब्दुल एजाज, नौशादभाई सिद्दीकी, विकास विरुटकर, मानव वाघमारे, सुनील गजलवार, सतीश मुरार, कृष्णा झाडे, कुणाल ढेंगारे, साहिल आगलावे, केतन जोरगेवार, नदीम शेख, समीर शेख, कोमिल मडावी, आदित्य ठेंगणे, विशाल इसनकर, विशाल पासवान, विपीन लभाणे, शुभम बाराहाते, अतुल तायडे, कार्तिक निकोडे, रुपेश कोंडावर, पवन बंडीवार, संजय रामटेके यांचेसह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.