BREAKING NEWS:
महाराष्ट्र

आरोग्य संचालक आणि लोकप्रतिनिधी च्या निष्क्रियते मुळे उपजिल्हा रुग्णालय आजारी??

Summary

आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागले असुन आरोग्य सेवा संचालक आणि लोकप्रतिनिधी च्या निष्क्रियते मुळे रुग्णालय आजारी पडले आहे. तसेच इतर अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. या उपजिल्हा रुग्णालयात जिल्हया सह लागुनच […]

आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागले असुन आरोग्य सेवा संचालक आणि लोकप्रतिनिधी च्या निष्क्रियते मुळे रुग्णालय आजारी पडले आहे. तसेच इतर अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
या उपजिल्हा रुग्णालयात जिल्हया सह लागुनच चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील रुग्ण ही उपचारासाठी येतात. परंतु मागील अनेक वर्षे पासून वैद्यकीय अधिक्षक पदा सह विविध विभागातील १३ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता या महत्वाच्या समस्या आवासून उभ्या आहेत. इतकेच नव्हे तर अत्याधुनिक सुविधा अभावी रुग्णाना रेफर करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिक्षका चे पद प्रभारी कडे सोपविण्यात आले आहे.. त्यामुळे अनेक कामे करीत असताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.. उपजिल्हा रुग्णालयाच्या कमिटीचे अध्यक्ष हे विधमान आमदार असूनही त्यांच्या निष्क्रियते मुळे अनेक समस्या चा शासनाकडे खंबीरपणे पाठपुरावा होत नाही. कमेटी चे अध्यक्षाचे दौरे, भूमीपूजन, उद्घाटन आणि स्वागत समारंभाचे कामच संपत नाही. या रुग्णालयात ४८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ३५ पदे भरण्यात आली तर १३ पदे भरण्यासाठी आरोग्य शासनाला यश मिळाले नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे.

येथील रिक्त पदे, तज्ञ डॉक्टर, आणि अत्याधुनिक सुविधा, उपकरणांची सोय व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकारी यांचे कडे पाठपुरावा केल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. छाया उईके यांनी सांगितले. तर रिक्त पदाच्या प्रश्नांची आरोग्य मंत्री राजेश टोपे याची आश्वासने फोल ठरले आहेत. आरोग्य मंत्री टोपे यांनी आजपर्यंत केवळ आश्वासने देऊन आरोग्य विभागात सेवा देणाऱ्यांची दिशाभूल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *