आज #ऐरोली – #काटई_नाका #उन्नत_मार्गाचा घेतला विस्तृत आढावा
Summary
प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर ऐरोली ते काटई हा #प्रवास फक्त #१०मिनिटांत पूर्ण होणार शीळफाट्यावरील #वाहतूक_कोंडी कमी करण्यासाठीचा #महत्वाकांक्षी #प्रकल्प असल्याने सातत्याने करत आहे पाठपुरावा उन्नत_मार्ग #फेज१ – #टनेल टप्पा #फेज१ या दोन कामांचा एम.एम.आर.डी.ए. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली #पाहणी पुणे – #मुंबई […]
प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर ऐरोली ते काटई हा #प्रवास फक्त #१०मिनिटांत पूर्ण होणार
शीळफाट्यावरील #वाहतूक_कोंडी कमी करण्यासाठीचा #महत्वाकांक्षी #प्रकल्प असल्याने सातत्याने करत आहे पाठपुरावा
उन्नत_मार्ग #फेज१ – #टनेल टप्पा #फेज१ या दोन कामांचा एम.एम.आर.डी.ए. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली #पाहणी
पुणे – #मुंबई #एक्सप्रेस #मार्गावरील सर्व बोगदयांपेक्षा #जास्त #लांबीचा #बोगदा हे प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य
सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार उन्नत मार्गाचा पहिला टप्पा
नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली – काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे विभाला दिले निर्देश…
ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग फेज १ चा आणि टनेल टप्पा फेज १ च्या कामाचा आज एम.एम.आर.डी.ए. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करत विस्तृत आढावा घेतला. यातील टप्पा क्रमांक १ ( फेज१ ) चे काम सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार असून , टनेल टप्पा क्रमांक १ चे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. ऐरोली ते मुंब्रा ( वाय जंक्शन ) या टप्प्यातील ६ मार्गिकांचे काम आणि टनेलचे काम अतिशय युद्धपातळीवर सुरू आहे.
ऐरोली ते #मुंब्रा ( वाय जंक्शन ) आणि मुंब्रा ( वाय जंक्शन ) ते #काटई पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून याचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली- अंबरनाथ-बदलापूर येथील रहिवाशांना होणार आहे. कारण, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
शीळफाट्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या कामाचा वेळोवेळी स्वतः पाठपुरावा करत आहे. या प्रकल्पात पुणे – मुंबई एक्सप्रेस मार्गावरील सर्व बोगद्यापेक्षा जास्त लांबीचा बोगदा आहे हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
टप्पा क्रमांक २ ( फेज २ ) च्या कामासाठी नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला असून, त्यास मान्यता मिळाल्यानंतर सर्व आवश्यक परवानग्या घेऊन, जमीन संपादनाची प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्यात येईल. यात होणाऱ्या बाधितांचे पुनर्वसन देखील ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने एम.एम.आर.डी.ए. मार्फत करण्यात येईल. उन्नत मार्ग १ ( फेज १ ) – टनेल टप्पा १ ( टनेल फेज १ ) या दोन कामांची पाहणी करत नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली – काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा असे निर्देश उपस्थित एम.एम.आर.डी.ए. च्या अधिकाऱ्यांना दिले.
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य