महाराष्ट्र

अनोखे अपहरण : लग्न मोडले म्हणून चक्क मुलगी व आई चे अपहरण प्रयत्न फसला

Summary

चंद्रपूर : नागभीड – नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाहरणि येथील मुलीचे लग्न चंद्रपूर येथील मुलाशी जुळले होते .मात्र मुलाची वर्तणूक चांगली नसल्याने लग्न तोडलेल्या मुलाने मुलीचे घर गाठून मुलीचे अपहरण करून पळून नेत असताना आईने आरड ओरड केल्याने आईसह […]

चंद्रपूर : नागभीड –

नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाहरणि येथील मुलीचे लग्न चंद्रपूर येथील मुलाशी जुळले होते .मात्र मुलाची वर्तणूक चांगली नसल्याने लग्न तोडलेल्या मुलाने मुलीचे घर गाठून मुलीचे अपहरण करून पळून नेत असताना आईने आरड ओरड केल्याने आईसह अपहरण केल्याची तक्रार नागभिड येथे करण्यात आली.

पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे साहेब यांनी लागलीच तपासाची चक्रे फिरविली . पोलिसांनी नाकेबंदी करण्यात आली असता मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर पोलिसांनी अपहरण करून पळून जात असलेल्या सर्वांना अटक करून नागभिड येथे आणण्यात आले असून वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही सर्व माहिती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस स्टेशन येथून सांगण्यात आले आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *