***अखेर रेल्वे सिंधि येथील नगराध्यक्ष अपात्र घोषित***
Summary
वर्धा जिल्हा वार्ता:-“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे नगरपरिषद अंतर्गत २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीतअनुसुचित जातीप्रवर्गातील महीला राखीव पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्यासंगिता शेंडेह्या विजयी झाल्या. चारहि वर्षात त्यांचा कार्यकाल वाईट रहाला. निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांपासून […]
वर्धा जिल्हा वार्ता:-“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे नगरपरिषद अंतर्गत २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीतअनुसुचित जातीप्रवर्गातील महीला राखीव पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्यासंगिता शेंडेह्या विजयी झाल्या.
चारहि वर्षात त्यांचा कार्यकाल वाईट रहाला.
निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांपासून निवडणूक प्रकियेनुसार १८० दिवसात म्हणजे सहा महिने पर्यंत. शौचालय नियमीत उपयोग प्रमाणपत्रनगरपालिका ला सादर करने अनिवार्य होते,मात्र नगराध्यक्ष संगीता शेंडे यांनी तक्रार होईपर्यंत नुकतेच पोटनिवडणुकीत चन्द्रशेखर बेलखोडे नगरसेवकाकरिता रिंगणात उभे झालेले यांनी जिल्हाधिकारीयांना तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत रोज शुक्रवार दिनांक १८/१२/२०२०ला “जिल्हाधिकारी विवेक भिमनवर”यांनी कार्यवाही करुन नगराध्यक्ष संगीता शेंडे यांना अपात्र घोषित केले.