नागपुर

पेंच नदी एसंबा (घाटरोहना) घाटाची अवैद्य रेती चोरून नेताना टिप्पर ट्रक पकडला दहा चाकी टिप्पर ट्रक मध्ये ४ ब्रॉस रेती सह १० लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त.

Summary

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पेंच नदीच्या एसंबा (घाटरोहना) रेती घाटातुन रेतीचा उपसा करून अवैद्य रित्या चोरून नेताना उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान हयानी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीने दहाचाकी टिप्पर ट्रक मध्ये१० ब्रॉस रेती कोबुन भरून चोरून नेताना […]

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पेंच नदीच्या एसंबा (घाटरोहना) रेती घाटातुन रेतीचा उपसा करून अवैद्य रित्या चोरून नेताना उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान हयानी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीने दहाचाकी टिप्पर ट्रक मध्ये१० ब्रॉस रेती कोबुन भरून चोरून नेताना पकडुन १० लाख १२ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
कन्हान कोळसा खाणी परिसरात अवैद्य कोळसा चोरी व पेंच नदीच्या एसंबा (घाटरोहना) घाटातुन मोठ या प्रमाणात अवैद्य रेती उपसा करून रेती चोरी जोमा त सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.१०) नोव्हेंबर २०२१ ला दुपारी ११ ते ११:४५ वाजता कामठी उपविभागीय पोलीस अधि कारी मुख्तार बागवान, पोशि धनराज चौरपगार व चालक पोशि सुरज श्रीनाथ सह पोलीस वाहनाने गोंडे गाव, एसंबा परिसरात पेट्रोलिंग करित असताना गोप निय सुत्राकडुन अवैध रेती वाहतुक करण्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीसांनी गोंडेगाव डुमरी रोड वर पंचासह हजर असतांना वाहन क्र.एम एच ४० बी एल ३८८८ दहाचाकी टिप्पर ट्रक एसंबा दिशेने येताना वाहन चालकास थांबवुन चालकाचे नाव विचारले अस ता नसिम मो. नजिर वय ३० वर्ष राह. बुनकर काॅलोनी कामठी सांगितले. पोलीस शिपाई यांनी वाहनाची पाह णी करून विचारफुस केली असता त्याने एसंबा रेती घाटातुन वाळु भरल्याचे व कागदपत्रे, परवाना नसल्या चे आणि टिप्पर ट्रक मालक सुशांत काळे राह. कामठी यांचे सांगण्यावरून चोरी केल्याचे सांगितले. सदर वाह नात अवैध रेती वाहतुक करतांना मिळुन आल्याने टिप्पर ट्रक किंमत १०,००,००० रुपये व ४ ब्रास रेती किंमत १२,००० रुपये असा एकुण १०,१२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे फिर्यादी धनराज चौरपगार यांच्या तक्रारीवरून वाहन चालक नसिम मो नजिर व वाहन मालक सुशांत काळे यांच्या विरुद्ध ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासाकरिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शना त कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे सह पोलीस करित आहे.

संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *