गडचिरोली

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी महेंद्र ब्राह्मणवाडे यांची निवड. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार

Summary

शेषराव येलेकर/गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विद्यमान युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तम संघटक कोरोना काळात राबवलेले विविध उपक्रम, याची पक्षनेतृत्वाने दखल घेतली आहे. त्यांच्या नियुक्तीने युवा, ओबीसी व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह […]

शेषराव येलेकर/गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विद्यमान युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तम संघटक कोरोना काळात राबवलेले विविध उपक्रम, याची पक्षनेतृत्वाने दखल घेतली आहे. त्यांच्या नियुक्तीने युवा, ओबीसी व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
सध्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यापूर्वी काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्षपद सांभाळले आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर ओबीसींचा आवाज बुलंद करणारे नेतृत्व, कोरोना काळात सतत 60 दिवस रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान व रक्तपुरवठा उपलब्ध करण्याचं मोठं काम त्यांच्या नेतृत्वात झालं आहे.
या दोन्ही नेत्यांचा आज दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी कात्रटवार काम्प्लेक्स येथे जिल्हा काँग्रेस कमिटी व पक्षाचे विविध सेल च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्याचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा तसेच प्रदेश महासचिव डॉ नामदेव उसेंडी यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव येलेकर जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, एस.टी. विधाते, दादाजी चापले, गोविंदराव बाणबले, शरद ब्राह्मणवाडे, चंद्रकांत शिवणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *