BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़

४ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग

Summary

तुमसर वार्ता:- चॉकलेट खाऊ देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन एका ४वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची घटना गुरुवार दिनांक १७ रोजी दुपारच्या सुमारास मोहाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुमसर तालुक्यातील मांढळ येथे घडली .अतिप्रसंग करणाऱ्या नरधमाला मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लक्ष्मीकांत […]

तुमसर वार्ता:- चॉकलेट खाऊ देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन एका ४वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची घटना गुरुवार दिनांक १७ रोजी दुपारच्या सुमारास मोहाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुमसर तालुक्यातील मांढळ येथे घडली .अतिप्रसंग करणाऱ्या नरधमाला मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लक्ष्मीकांत सेलोकर रा. माढळ असे आरोपीचे नाव आहे.

माढळ गावातील पीडित मुलगी आणि आरोपी वय वर्ष
३१ हे शेजारी शेजारी राहतात .घटनेच्या दिवशी पीडित मुलगी घराशेजारी सुरू असलेल्या हवन कार्य क्रमसाठी.
गेली होती. त्यानंतर प्रसादासाठी भावाला घेऊन येते म्हणून घरी परत आली.भाऊ झोपलेला असल्याने आईने तिला ‘तू प्रसाद घेऊन ये’ असे सागितले मुलगी पुन्हा प्रसाद घेण्याकरिता शेजारच्या घरी गेली बराच वेळ ती परत न आल्याने आईने शोध सुरू केला .काही वेळानंतर
मुलगी शेजारच्या युवकासोबत घराकडे येताना दिसली .ती रडत असल्याने आईने तिला विचारणा केली असताना तिने आरोपी लक्ष्मी कांत. उर्फ छोटू सीताराम सेलोकार याने चॉकलेट देतो असे म्हणून त्याने तिला जवळच बांधकाम सुरू असलेल्या एका घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे तिने आईला सांगितले .

या प्रकरणी तक्रार मोहाडी पोलिस स्टशनमध्ये करण्यात आली असून आरोपी विरूद्ध ३७६ ए.बी. भादवि सहकलम ४,६,८, बाल लैंगिक अधिनियम अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तपास पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे पोलिस नायक मिथुन चादेवार करीत आहे.

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *