ब्लॉग

ऑनलाइन शिक्षण वंचितांच्या समस्या

Summary

ऑनलाइन शिक्षण वंचितांच्या समस्या वर्गात बसून घेतलेले शिक्षण व ऑनलाईन शिक्षण यात फार मोठा फरक आहे. ऑनलाइन शिक्षण घेणे हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि क्षमता ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांची आहे. कोरोना आणि त्यामुळे झालेल्या टाळेबंदी मुळे अनेक […]

ऑनलाइन शिक्षण वंचितांच्या समस्या
वर्गात बसून घेतलेले शिक्षण व ऑनलाईन शिक्षण यात फार मोठा फरक आहे. ऑनलाइन शिक्षण घेणे हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि क्षमता ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांची आहे. कोरोना आणि त्यामुळे झालेल्या टाळेबंदी मुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत .सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचे शिक्षण व आरोग्य .शाळा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाइन शिक्षण हे पुढे आलं पण आपल्याकडे त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल इंटरनेट नेटवर्क या समस्या आहेत. कष्टकरी शेतकरी सकाळी उठल्यावर कामावर जाणार आणि कामावर जायच यापूर्वी तो आपल्या मुलाकडे अँड्रॉइड मोबाईल देणार हे मात्र अर्धसत्य आहे. ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ ‘झाडाखालची शाळा’ टिलीमिली, स्वाध्याय ,शनिवार ची कथा यासारख्या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातोय. गणितासारखे क्लिष्ट विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनावर्गातील शिक्षण हाच योग्य पर्याय आहे .कोरोणा संकटाच्या काळात शासनकर्त्यांना शालेय शिक्षण व पोषण आहार या समस्या भेडसावत आहेत. शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी संगणक , संगणकीय ज्ञान, वायरलेस ,विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल, इंटरनेट डाटा यासारख्या समस्या आवासून उभ्या आहेत. ग्रामीण भागात शिक्षणासाठी फक्त शिक्षक हाच पर्याय असल्यामुळे शिक्षकांनाही तारेवरची कसरत सांभाळावी लागते. शिक्षकांसमोर अनेक समस्या आणि आव्हाने उभे आहेत . ऑनलाईन शिक्षणामुळे डोळ्यांचे आजार ,डोकेदुखी चिडचिडेपणा यासारख्या आरोग्याच्या समस्या विद्यार्थ्यांना भेडसावणार हे मात्र निश्चित.
कोरोनाविषाणू ची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतर जगासमोर चे सर्वात मोठे संकट आहे. युनेस्कोच्या अहवालानुसार 2020 मध्ये भारतात 15 लाख शाळा बंद आहेत .26 कोटी विद्यार्थी व एकूण 89 लाख शिक्षक घरी बसले आहेत. दूरशिक्षण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, युट्युब ,मल्टिमीडिया, मोबाईल फोन, ई लायब्ररी इत्यादी च्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी उपक्रम सुरू आहेत. मध्यमवर्गीयांची मुलांना सर्व सुख सोयी उपलब्ध असल्यामुळे त्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे मात्र भारतामध्ये 52 टक्के कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं सरकारी शाळेत शिक्षण घेत आहेत.

ट्राय च्या अहवालानुसार अहवालानुसार इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 68 कोटी45 लाख ,इंटरनेट सह मोबाईल वापरण्याची संख्या 48 कोटी82लाख. हा माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार असला तरी भारतात फक्त 52 टक्के जनता इंटरनेटचा वापर करते म्हणजे निम्मा भारत इंटरनेटच्या वापरापासून वंचित आहे. सरकारी डिजिटल लायब्ररी ,स्वयम्, सोच गंगा याचा फायदा मर्यादीत आहे. वंचितांचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवून मुलांच्या मु शिक्षणासाठी राज्य व केंद्र सरकारने तातडीने उपाय योजना कराव्यात. पुढील पिढीचे भविष्य उज्वल करण्यासाठी शेतकरी कष्टकरी वंचितांच्या शिक्षणासाठी शासनाने नवीन ध्येय धोरण निश्चित करावीत.
लेखक- विनोद लांडगे
एम ए बि एड (इंग्रजी, मराठी ,इतिहास ,समाजशास्त्र राज्यशास्त्र)
सामाजिक विचारवंत
शिक्षण संस्थापक

विनोद लांडगे
सामाजिक विचारवंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *