BREAKING NEWS:
ब्लॉग

🇫🇷 फ्रान्समध्ये नेमके काय झाले ? जगात बऱ्याच शहरात फ्रान्सचा निषेध कशासाठी सुरू ? भारताने फ्रान्सला पाठिंबा का दिला ? जाणून घ्या सविस्तर

Summary

💥 फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद सध्या जगभरात उमटत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात आता भारतातदेखील निदर्शने होत आहेत. भोपाळ आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा आणि भूमिकेचा निषेध करण्यात येत आहे. 🙆‍♂️ नेमका वाद काय आहे ? 🟢 […]

💥 फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद सध्या जगभरात उमटत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात आता भारतातदेखील निदर्शने होत आहेत. भोपाळ आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा आणि भूमिकेचा निषेध करण्यात येत आहे.

🙆‍♂️ नेमका वाद काय आहे ?

🟢 पॅरिसच्या फ्रेंच मिडल स्कुलमध्ये एक पाठ शिकवताना फ्रान्समधील शिक्षकाने शार्ली हेब्दो वृत्तपत्राने 2015 साली मोहंमद पैगंबराचे प्रकाशित केलेले व्यंगचित्र दाखवले होते. पैगंबरांचे चित्र दाखवणे इस्लाम मध्ये निषेध मानले जाते.

🟢 त्याचा सूड म्हणून एका चेचंन वंशाच्या मुस्लिम विद्यार्थ्याने 16 ऑक्टोबरला त्या शिक्षकाचा गळा चिरुन त्याची हत्या केली होती.

🟢 या हत्येनंतर संतापलेले राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हा इस्लामी अतिरेक्यांचा हल्ला असल्याचे म्हटल्याने वाद आणखी उफाळला.

🟢 फ्रान्समधील मुस्लिम मुख्य प्रवाहापासून बाजूला पडत असल्याचे सांगितले होते. यावर फ्रान्समध्ये इस्लाम विरोधी अजेंडा राबवत असल्याचा आरोप अनेक मुस्लिम राष्ट्र करत आहेत.

चर्चबाहेर चाकूहल्ल्यात तिघांचा मृत्यू : हा सर्व वाद सुरु असतानाच फ्रान्समधील नीस शहरामध्ये नोट्रे डेम चर्चबाहेर एक चाकूधारी व्यक्तीने हल्ला केला. यामध्ये एका 60 वर्षीय महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला.

🤝 भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फ्रान्सला पाठींबा : फ्रान्समधील चर्चबाहेर झालेल्या हल्ल्याच भारताकडून निषेध करण्यात आला. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, भारत दहशतवादाच्या लढाईत फ्रान्ससोबत असल्याचं जाहीर केले.

🛣️ मुंबईत निषेध : मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स पायदळी तुडवण्यात आले.

🛣️ भोपाळमध्ये निदर्शने : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुरुवारी आयोजित केलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने इस्लाम धर्मीय पोहोचले होते. यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे फोटो आणि फ्रान्सचे झेंडे पेटवून देण्यात आले.

☪️ मुस्लिम राष्ट्रांकडून फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा : तुर्कीने या प्रकरणात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या वक्तव्यावर टीका केली.

👉 त्यानंतर कतार, साैदी अरेबिया, जाॅर्डन, लिबिया, सिरिया, कुवेत, गाझाने फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली.

👉 पाकिस्तान व इराणच्या संसदेने फ्रान्सच्या विराेधात प्रस्ताव पारित केला आहे.

🗣️ पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांची प्रतिक्रिया : इम्रान खान यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. हिंसा करणारे दहशतवादी कोणीही असो, टीका त्यांच्यावर व्हायला हवी, मात्र मॅक्रॉन यांनी इस्लामला टार्गेट करणे हा इस्लामोफोबिया आहे, असे इम्रान खान म्हणाले.

✊ एकंदरीत फ्रान्समधील या घडामोडींचे जगभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. कोणी फ्रान्सच्या बाजूने तर कोणी विरोधात भूमिका जाहीर करत आहेत. पण मुद्दा हा फ्रान्सच्या समर्थनाचा किंवा विरोधाचा नाही, तर जगाने एकत्र येऊन दहशतवादाविरोधात मूठ आवळण्याची गरज आहे.

साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *