*गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या जिल्हाअध्यक्ष पदावर श्री विजय शिवणकर यांची नियुक्ती*
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नेते मा. खा. श्री प्रफुल पटेल यांचा अनुशंसेवर मा. प्रदेशाध्य्क्ष ना. श्री जयंत पाटिल यानि श्री विजय शिवणकर यांची जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या जिल्हाअध्यक्ष स्व. पंचम बिसेन यांच्या अकस्मात निधना मुळे रिक्त झालेल्या पदावर श्री विजय शिवणकर यांची नियुक्ती झाली आहे .
श्री विजय शिवणकर याना जिल्हा परिषदचे अध्यक्ष व अन्य पदाधीकारी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे व सामान्य कार्यकर्ताला घेऊन संघटनात्मक बांधणी करून राष्ट्रवादी पक्षाला सक्षम करण्यात यश मिळेल अशी राष्ट्रवादी पक्षाने अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्या बद्दल पूर्व आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, श्री नरेश माहेश्वरी, श्री गंगाधर परशुरामकर, श्री विनोद हरिखेडे, श्री देवेंद्रनाथ चौबे , जिल्हयातिल सर्व पक्ष पदाधिकारीयांनी व कार्यकर्ताने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९