महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विधानभवनात अभिवादन

Summary

मुंबई, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण केले. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ.विलास आठवले, […]

मुंबई, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण केले.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ.विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *