BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

ओबीसी आश्रमशाळांमधून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्या – मंत्री अतुल सावे

Summary

मुंबई, दि. ३० : इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश इतर मागास बहुजन […]

मुंबई, दि. ३० : इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमधील मान्यताप्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ओबीसी विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालिका सोनाली मुळे आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तयारी

चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांसह ऑलिम्पियाड परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी विशेष नियोजन करावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेचा विकास करण्यासाठी नियमित सराव, मार्गदर्शन आणि आवश्यक शैक्षणिक उपक्रम राबवावेत, अशा सूचना मंत्री सावे यांनी दिल्या. विभागामार्फत प्रत्येक आश्रमशाळेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्रीडा साहित्याचा विद्यार्थ्यांनी योग्य आणि पूर्ण वापर करावा, याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन यासारखे उपक्रम नियमितपणे आयोजित करावेत, असेही मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा व विविध शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विकासाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावर विभागाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *