BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुंबई शहर जिल्ह्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभातील २० मेळाव्यांत ८६० उमेदवारांची अंतिम निवड ५ हजार ८१९ उमेदवारांचा सहभाग, ४६ उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप

Summary

निवड झालेल्या उमेदवारांचे मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले अभिनंदन मुंबई, दि. ३० : सेवा संकल्प अभियानामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी झालेल्या २० रोजगार मेळाव्यांमध्ये ५ हजार ८१९ उमेदवार सहभागी […]

  • निवड झालेल्या उमेदवारांचे मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले अभिनंदन

मुंबई, दि. ३० : सेवा संकल्प अभियानामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी झालेल्या २० रोजगार मेळाव्यांमध्ये ५ हजार ८१९ उमेदवार सहभागी झाले. त्यापैकी २ हजार ४१२ उमेदवारांची प्राथमिक, तर ८६० उमेदवारांची अंतिम निवड झाली. अंतिम निवड झालेल्यांपैकी ४६ उमेदवारांना नियुक्ति पत्रांचे वाटप करण्यात आले निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अभिनंदन केले आहे.

या रोजगार मेळाव्यांमध्ये २५३ उद्योजक सहभागी झाले होते. त्यांनी ४ हजार १०७ रिक्तपदे उपलब्ध करून दिली. एकूण २० मेळाव्यांपैकी दोन महिला रोजगार मेळावे होते.मेळाव्यांना ३ हजार २८२ महिला आणि २ हजार ५३७ पुरुष उमेदवार उपस्थित होते. प्राथमिक निवड झालेल्यांमध्ये १ हजार ४०३ महिला आणि १ हजार ९ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. अंतिम निवड झालेल्यांमध्ये ६६८ महिला आणि १९२ पुरुष उमेदवार आहेत.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातील मेळाव्यात १ हजार २२० उमेदवार सहभागी झाले. त्यापैकी ८५२ उमेदवारांची प्राथमिक आणि ५३२ उमेदवारांची अंतिम निवड झाली. अंजुमन-ए-इस्लामच्या एम.एच. साबू सिद्दिक पॉलिटेक्निकमधील मेळाव्यात सर्वाधिक १ हजार ५४८ उमेदवार सहभागी झाले. त्यापैकी ५६१ उमेदवारांची प्राथमिक आणि ११४ उमेदवारांची अंतिम निवड झाली.एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातील १८, श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला कला व वाणिज्य महाविद्यालयातील ७ आणि बी.टी.आर.आय. एलफिन्स्टन, मुंबई येथील २१ उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. अशी माहिती सुनिल पवार, सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मुंबई शहर यांनी दिली आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *