भंडारा: हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रशासनाचे ‘ग्रहण’! लाखांदूरच्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती रोखली!
Summary
रक्ताचे पाणी करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या हक्कावर डल्ला? सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; संतापलेल्या कामगारांचा आंदोलनाचा ‘फुल टू’ इशारा! लाखांदूर/भंडारा (ब्युरो रिपोर्ट): एकीकडे सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘शिक्षण सर्वांसाठी’ अशा घोषणांचा पाऊस पाडत असताना, दुसरीकडे भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील […]
रक्ताचे पाणी करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या हक्कावर डल्ला? सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; संतापलेल्या कामगारांचा आंदोलनाचा ‘फुल टू’ इशारा!
लाखांदूर/भंडारा (ब्युरो रिपोर्ट):
एकीकडे सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘शिक्षण सर्वांसाठी’ अशा घोषणांचा पाऊस पाडत असताना, दुसरीकडे भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांची मुले मात्र शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शैक्षणिक वर्ष संपत आले, परीक्षांचे दिवस जवळ आले, तरीही हक्काचा पैसा खात्यात जमा न झाल्याने गरीब कामगार कुटुंबांमध्ये आता संतापाचा ज्वालामुखी फाटला आहे!.
🚨 योजना की केवळ कागदी घोडे?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. लाखांदूरमधील हजारो कामगारांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि ऑनलाइन-ऑफलाइन अर्ज सादर केले आहेत. मात्र, महिने उलटूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे ही रक्कम ‘फाईल्स’मध्येच अडकून पडली आहे.
🚨 नव्या आयुक्तांचा ‘हनिमून पिरीयड’ संपला, पण प्रश्न जैसे थे!
भंडारा जिल्ह्याचे नवे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून अशोक बहीर यांनी पदभार स्वीकारून आता दीड महिना उलटला आहे. जिल्ह्याला नवा अधिकारी मिळाल्यावर प्रलंबित प्रश्नांची ‘फाईल’ वेगाने पुढे सरकेल, अशी मोठी अपेक्षा कामगारांना होती. मात्र, तांत्रिक त्रुटी आणि संनियंत्रण समितीच्या संथ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. आयुक्त महोदय केवळ कार्यालयात बसून कागदं नाचवणार की प्रत्यक्ष मैदानात उतरून कामगारांना न्याय देणार? असा तिखट सवाल आता विचारला जात आहे.
🚨 कामगारांचा आर्त टाहो: “आमच्या रक्ताच्या पाण्याचा हिशोब द्या!”
“आम्ही ऊन-पावसात कष्ट करून रक्ताचे पाणी करतो, जेणेकरून आमच्या मुलांनी शिकावे. पण शासनाच्या योजना केवळ नावापुरत्या उरल्या आहेत का?” असा संतप्त सवाल लाखांदूरमधील एका त्रस्त कामगाराने ‘पोलीस योद्धा’शी बोलताना व्यक्त केला. जर तातडीने शिष्यवृत्तीचे वाटप झाले नाही, तर कामगार संघटना रस्त्यावर उतरून ‘आरपारची लढाई’ लढण्याच्या तयारीत आहेत.
⚠️ प्रशासकीय सावळागोंधळ: आता लक्ष संनियंत्रण समितीकडे!
जिल्हा प्रशासन आणि कामगार कल्याण मंडळ आता या पेटलेल्या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. केवळ आश्वासनांची बोळवण कामगारांना मान्य नाही, त्यांना हवी आहे थेट कृती!
वृत्त संकलन: गणेश सोनपिंपळे
न्यूज रिपोर्टर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
