BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव तयार करा – मंत्री आदिती तटकरे

Summary

मुंबई, दि. १७: रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्या इमारतीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रासंदर्भात मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली […]

मुंबई, दि. १७: रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्या इमारतीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रासंदर्भात मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य निधी जाधव, पंचायत समिती रोहा उपसभापती संजय मांडलूस्कर, पं.स. सदस्य जगन्नाथ धनावडे, राकेश शिंदे व नरेंद्र जाधव, कार्यकारी अभियंता (बांधकाम) विनायक तेलंग, स्थापत्य अभियंता सचिन पोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका साळुंखे, बांधकाम उपअभियंता शिंदे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेवाडी येथील सध्याची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने तिचे प्रथम स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानंतर बांधकाम विभागामार्फत नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. या प्रक्रियेदरम्यान आरोग्य केंद्राचे कामकाज खंडित होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जवळील खासगी जागेत आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आरोग्य सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची तातडीने भरती करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया त्वरित राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच रुग्ण कल्याण समिती लवकरात लवकर स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या या आरोग्य केंद्रात रुग्णांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आवश्यक त्या सर्व सहायक कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. याशिवाय रुग्णांना गैरसोय होऊ नये यासाठी ओपीडीची वेळ निश्चित करून ती नागरिकांना कळविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *