BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जवाहरनगर पोलिसांचा दणका! ४० लाखांच्या ट्रकसह अवैध रेती जप्त; महसूल आणि पोलीस दलाची संयुक्त कारवाई ​खरबी शिवारात रेती तस्करांचा डाव उधळला; गांधी चौकातील चालक आणि मालकावर गुन्हा दाखल

Summary

भंडारा: जिल्ह्यात रेती तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असतानाच, जवाहरनगर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत ४० लाखांचा ट्रक आणि विनापरवाना रेती जप्त करून तस्करांचे धाबे दणाणले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेतीची चोरी करणाऱ्या टोळीवर महसूल विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा […]

भंडारा:
जिल्ह्यात रेती तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असतानाच, जवाहरनगर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत ४० लाखांचा ट्रक आणि विनापरवाना रेती जप्त करून तस्करांचे धाबे दणाणले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेतीची चोरी करणाऱ्या टोळीवर महसूल विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

​मध्यरात्रीचा थरार!
​दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०:२० वाजताच्या सुमारास, खरबी शिवार परिसरात ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी विक्रम भानुदास राठोड (वय ४५ वर्षे) हे गस्तीवर असताना, त्यांना रेतीची अवैध वाहतूक होताना दिसून आली. त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाईचे चक्र फिरवले.

संगणमत करून चोरीचा डाव

या प्रकरणात ट्रक चालक मेधनाथ कार्तीक बावनकर (वय ३९ वर्षे, रा. गांधी चौक, भंडारा) आणि ट्रक मालक मनिष मेहर (वय ३८ वर्षे, रा. भंडारा) यांनी संगणमत करून रेतीची चोरी केली. ट्रक क्रमांक MH-36 AF-3774 मध्ये विनापरवाना १० ब्रास रेती भरून तिची वाहतूक केली जात होती.

४० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत खालील माल जप्त केला आहे: ट्रक (MH-36 AF-3774): किंमत ४०,००,००० रुपये.
​१० ब्रास रेती: अंदाजे किंमत ६०,००० रुपये.
​एकूण जप्त माल: ४०,६०,००० रुपये.

​अनेक कलमान्वये गुन्हा नोंद

​जवाहरनगर पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक १०६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८ (७) (८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम १५ नुसार कडक कारवाई करण्यात आली आहे.
​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे (ब.नं. ८६३) हे करत आहेत.

​वृत्त संकलन: अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *