नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळीत युथ फॉर डिजिटल लिटरेसी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष शिबीर उत्साहात सुरू

Summary

कोंढाळी | प्रतिनिधी युवकांमध्ये सामाजिक भान, डिजिटल साक्षरता व देशभक्तीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कार्यरत स्व. राजेंद्रसिंह उर्फ बाबा व्यास कला व वाणिज्य महाविद्यालय, कोंढाळी यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभागाअंतर्गत ‘Youth […]

कोंढाळी | प्रतिनिधी
युवकांमध्ये सामाजिक भान, डिजिटल साक्षरता व देशभक्तीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कार्यरत स्व. राजेंद्रसिंह उर्फ बाबा व्यास कला व वाणिज्य महाविद्यालय, कोंढाळी यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभागाअंतर्गत ‘Youth For Digital Literacy’ या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर रविवार दि. ०१ फेब्रुवारी ते शनिवार दि. ०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बहिरमबाबा देवस्थान, मौजा नांदोरा खापा (सोनार), ता. काटोल, जि. नागपूर येथे उत्साहात सुरू आहे.
शिबीरार्थींच्या आगमनाने वातावरणात चैतन्य
रविवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी स्वयंसेवकांच्या आगमनाने शिबीरास औपचारिक सुरुवात झाली. गावात स्वयंसेवकांच्या उपस्थितीमुळे सामाजिक कार्याचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे.
उद्घाटन समारंभ सोमवारी
सोमवार दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिबीराचा उद्घाटन समारंभ पार पडला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वप्नील सुरेंद्रसिंह व्यास (सदस्य, महाविद्यालय विकास समिती, कोंढाळी) होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन देवेन्द्र मरस्कोल्हे, सरपंच ग्रामपंचायत नांदोरा (खापा) यांच्या हस्ते झाले.
यावेळी रमेशराव गिरडकर (अध्यक्ष, बहिरमबाबा देवस्थान), उत्तमराव गिरडकर (सदस्य, देवस्थान) यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य, देशभक्ती व डिजिटल भारतावर मार्गदर्शन
शिबिरादरम्यान विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. ०३ फेब्रुवारी
मार्गदर्शन : डॉ. के. ए. सैय्यद (कोंढाळी)
विषय : सिकलसेल आजार व त्यावरील उपाय
अध्यक्ष : प्रा. डॉ. लोमेश्वर घागरे
बुधवार दि. ०४ फेब्रुवारी
मार्गदर्शन : कवी व समाजप्रबोधनकार सुरेश मलवे
विशेष सादरीकरण : ‘वंदे मातरम्’ देशभक्ती गीत
अध्यक्ष : प्रा. डॉ. जी. वाय. कठाणे
गुरुवार दि. ०५ फेब्रुवारी
मार्गदर्शन : प्रा. गुरुदास नेहारे (नबीरा महाविद्यालय, काटोल)
विषय : आधुनिक डिजिटल भारत
अध्यक्ष : प्रा. डॉ. एच. व्ही. लाडके
सामाजिक उपक्रमांना प्राधान्य
या विशेष शिबिरात स्वयंसेवकांमार्फत
स्वच्छता अभियान
श्रमसंस्कार व श्रमदान
ग्रामस्वच्छता
आरोग्य जनजागृती
समाज प्रबोधन
असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे ‘डिजिटल इंडिया’सह सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत आहे.
शिबीराचा समारोपीय सोहळा
शुक्रवार दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिबीराचा समारोपीय समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुर्गा प्रसाद पांडे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती, कोंढाळी) असतील.
प्रमुख अतिथी म्हणून मा. बबलुजी ऊईके (उपसरपंच, गटग्रामपंचायत नांदोरा खापा – सोनार) तर प्रमुख उपस्थितीत गजाननराव शेंडे (उपाध्यक्ष, बहिरमबाबा देवस्थान, कोंढाळी) राहणार आहेत.
शिस्तबद्ध दैनंदिन दिनक्रम
शिबिरात दररोज सकाळी प्रार्थना, योग व व्यायाम,
श्रमदान,
बौद्धिक कार्यक्रम,
सायंकाळी प्रार्थना व सांस्कृतिक कार्यक्रम
असा शिस्तबद्ध दिनक्रम राबविण्यात येत आहे.
मार्गदर्शन व संयोजन
हे विशेष शिबीर
प्रा. डॉ. आर. बी. खरडे (कार्यकारी प्राचार्य) व
प्रा. डॉ. आर. जी. अंबाडकर (रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी)
यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी महाविद्यालयीन कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *