स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 : चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी डॉ. अशोकजी नेते यांचा दौरा; भाजपाच्या उमेदवारांना विजयी शुभेच्छा..
Summary
चंद्रपूर–गडचिरोली | दि. १८ नोव्हेंबर २०२५ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीची चुरस वाढत असताना,चंद्रपुर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी व भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी काल चंद्रपुर जिल्ह्याचा […]
चंद्रपूर–गडचिरोली | दि. १८ नोव्हेंबर २०२५
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीची चुरस वाढत असताना,चंद्रपुर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी व भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी काल चंद्रपुर जिल्ह्याचा दिवसभर दमदार दौरा केला.
नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी मूल, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी आणि गडचिरोली येथे भेट देत भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांशी संवाद साधला. संघटनात्मक तयारी, स्थानिक मुद्दे आणि जनतेच्या अपेक्षांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
उमेदवारांची उमेद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मा.खा. डॉ. नेते यांनी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी विश्वास व्यक्त केला—
“भाजपाच्या सुशासनावर जनतेचा दृढ विश्वास आहे. हा विश्वास आपल्या विजयाचे भक्कम आधारस्तंभ ठरेल.”
जिल्ह्यातील हा दौरा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण जाणवत आहे.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो.7057785181
