चन्द्रपुर महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

राजकुमार भाऊ खोब्रागडे यांची नगरसेवकपदासाठी जोरदार तयारी प्रभाग क्र. ४ मध्ये संभाव्य उमेदवार म्हणून नाव चर्चेत

Summary

चंद्रपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील राजीव गांधी वॉर्ड (बंगाली कॅम्प) परिसरात राजकीय चर्चांना गती आली आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून राजकुमार भाऊ खोब्रागडे हे संभाव्य भावी नगरसेवक म्हणून जोरदार चर्चेत आहेत. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या पोस्ट […]

चंद्रपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील राजीव गांधी वॉर्ड (बंगाली कॅम्प) परिसरात राजकीय चर्चांना गती आली आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून राजकुमार भाऊ खोब्रागडे हे संभाव्य भावी नगरसेवक म्हणून जोरदार चर्चेत आहेत.

सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या पोस्ट आणि प्रचारात्मक बॅनरमुळे त्यांच्या नावाला अधिक गती मिळत असून स्थानिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
शांत स्वभाव, लोकसंग्रह, तडफदार नेतृत्व आणि नागरिकांमध्ये असलेला संपर्क यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे.

विशेष म्हणजे राजकुमार खोब्रागडे हे पोलिस योद्धा न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक व डायरेक्टर असल्याने सामाजिक, प्रशासकीय आणि सार्वजनिक विषयांवरील त्यांचा अभ्यास घट्ट आहे. मागील काही वर्षांपासून त्यांनी स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या तक्रारी आणि शहरी समस्यांवर सातत्याने आवाज उठवला आहे.

स्थानिक मतदारसंघातील नागरिकांमध्ये त्यांच्या प्रामाणिक स्वभावाबद्दल, साधेपणाबद्दल आणि काम करण्याच्या पद्धतीबद्दल चांगली प्रतिमा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

आगामी काळात त्यांच्या अधिकृत उमेदवारीबाबत अपक्ष स्तरावर कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *