कोंढाळी नगरपंचायतीस दोन कोटींचा विकासनिधी — आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
Summary
कोंढाळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने “वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत कोंढाळी नगरपंचायतीस दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून, शासन निर्णय क्रमांक नपावै-२०२५/प्र.क्र.१५०(११)/नवि-१६ (ई-११७९०९२) दिनांक १४ ऑक्टोबर […]
कोंढाळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने “वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत कोंढाळी नगरपंचायतीस दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून, शासन निर्णय क्रमांक नपावै-२०२५/प्र.क्र.१५०(११)/नवि-१६ (ई-११७९०९२) दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.
नगरविकास विभागाच्या या निर्णयानुसार नरखेड नगरपरिषदेस ३ कोटी आणि कोंढाळी नगरपंचायतीस २ कोटी रुपये असा एकूण ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून नगर क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधा, रस्ते, नाल्या, प्रकाशव्यवस्था व सार्वजनिक उपक्रमांची कामे हाती घेतली जाणार आहेत.
शासनाच्या अटींनुसार, कामांचा ९० टक्के खर्च राज्य शासन तर उर्वरित १० टक्के खर्च नगरपंचायत करणार असून सर्व कामे ई-निविदा प्रणालीद्वारे व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने करण्यात येतील. या दोन कोटी घ्या विकास निधीतून एक कोटी दहा लाख आठवडी बाजारात व्यापारी संकुल तर ९०लाख रूपये तवक्कल सभागृहालगत समाज भावना साठी चां विकास निधी उपलब्ध करून देण्यात आमदार चरणसिंग ठाकूर यांना यश आले आहे. कोंढिळी चे विकासासाठी वेळो वेळी आणखी विकास निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती आमदार चरणसिंग ठाकूर यांनी दिली आहे. या करिता कोंढाळीकरांनी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
आमदार चरणसिंग ठाकूर म्हणाले, “या निधीमुळे कोंढाळीच्या विकासाला गती मिळेल. नगरपंचायतीच्या प्राधान्यक्रमानुसार लवकरच पहिल्या टप्प्यातील कामे सुरू होतील.”
या निर्णयामुळे कोंढाळी शहरात समाधानाचे वातावरण असून नागरिकांनी आमदार ठाकूर व शासनाचे आभार मानले आहेत.
— प्रतिनिधी, कोंढाळी
