BREAKING NEWS:
कृषि महाराष्ट्र रोजगार हेडलाइन

PMEGP : पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा अशाप्रकारे लाभ घ्यावा; आवश्यक कागदपत्रे कोणती ?

Summary

केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग बोर्ड यांचे कार्यालयामार्फत ग्रामीण भागामध्ये व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शहरी व ग्रामीण भागात केली […]

केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग बोर्ड यांचे कार्यालयामार्फत ग्रामीण भागामध्ये व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शहरी व ग्रामीण भागात केली जाते. स्वयं रोजगाराच्या नव्या उद्योगांमार्फत सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून देशातील शहरी क्षेत्रांप्रमाणेच ग्रामीण क्षेत्रात देखील रोजगाराची हमी देणे हे उद्धिष्ट आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना एकत्र आणणे व स्वयंरोजगार मिळवून देणे, बेरोजगारांची संख्या कमी करणे आणि त्याच्या विकासात वाढ करणे हे एक उद्दिष्ट आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? :

१: पासपोर्ट साईझ फोटो, योग्यरित्या भरलेला अर्ज व प्रकल्प अहवाल
२: अर्जदाराची ओळख व पत्त्याचे पुरावे
३: पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
४: विशेष श्रेणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
५: उद्योजक विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
६: SC/ST/OBC/अल्पसंख्याक/माजी सैनिक/PHC साठी प्रमाणपत्र
७: शैक्षणिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र असेल तर
८: बँक किंवा NBFC द्वारे आवश्यक असलेले इतर कोणतेही कागदपत्रे
९: PMEGP ई-पोर्टल अर्जदारांना PMEGP नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

https://www.kviconline.gov.in/pmegp.jsp

येथे अर्ज ऑनलाइन भरून सबमिट करा.

कर्ज फेडीचा कालावधी काय ? :

१: बँकचे कर्ज परतफेडीचा कालावधी 3 ते 7 वर्षापर्यंतचा असतो. बँकेच्या कर्जाचा व्याजदर प्रचलित दराप्रमाणे असतो.
२: कर्जच्या मंजूरीनंतर व वाटपापूर्वी लाभार्थ्याने संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण घेतलेले असणे अनिर्वाय आहे.
३: लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर नोडल बँकेत मार्जिन मनी अनुदानासाठी केस पाठविले जाते.
४: त्यानंतर अनुदानीत अमाऊंट नोडल बँकेकडून कर्ज देणा-या बँकांना वितरीत करण्यात येते.
५: वितरीत करण्यात आलेले अनुदान व लाभार्थीचे नांवे 3 वर्षाकरिता टर्म डिपॉझिट रिसीट मध्ये डिपॉझिट करण्यात येते.
६: तीन वर्षानंतर खात्री केल्यानंतर अनुदानीत रक्कम कर्ज खात्यात पाठवली जाते.
अश्याप्रकारे अर्जदारास उद्योग व्यवसायासाठी कर्ज सुविधा तसेच अनुदान सुविधा उपलब्ध करण्यात येते.

ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

१: सर्वप्रथम ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी PMEGP च्या अधिकृत वेबसाइट वर क्लिक करा. https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp
२: ऑनलाइन PMEGP अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक . तत्त्वांचे अनुसरण करा आणि तुमची माहिती भरा.
३: सर्व माहिती भरल्यानंतर, भरलेले ट्रॅक सेव्ह करण्यासाठी ‘सेव्ह अॅप्लिकंट डेटा’ वर क्लिक करा.
४: डेटा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमी करण्यासाठी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
५: अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जदाराचा आयडी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल.

ऑफलाईन अर्ज कसा करावा

१: अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
२: सर्व माहिती भरल्यानंतर, अर्ज मसुदा म्हणून जतन करा.
३: अर्जाची प्रिंटआउट घ्या.
४: अर्जाची प्रिंटआउट जवळच्या कार्यालयात जमा करा.
५: संबंधित बँकेने केलेल्या सर्व अटी पूर्ण करा.

पीएमईजीपी कर्ज वाटप :-

१: अर्ज मंजूर झाल्यानंतर, बँक प्रकल्प खर्चाच्या 95 टक्के समाजातील दुर्बल घटकांसाठी किंवा ९० टक्के सामान्य अर्जदारांसाठी वाटप करते.
२: यापैकी 15-35 % मार्जिन मनी किंवा सबसिडी सरकार प्रदान करते. बँकांकडून घेतलेल्या मार्जिन मनीची रक्कम अर्जदाराने घेतलेल्या वास्तविक भांडवली खर्चाच्या प्रमाणात असेल. उर्वरित मार्जिन मनी जी न मिळालेल्या रकमेच्या प्रमाणात असते ती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (KVIC) परत करावी लागते.
३: कार्यरत भांडवलाची आवश्यकता कर्जासाठी आवश्यक आहे जी मार्जिन मनी लॉक केल्यानंतर 3 वर्षांत किमान एकदा कार्यरत भांडवल खर्च रोख क्रेडिट मर्यादेइतका असावा. शिवाय, तो मंजूर मर्यादेच्या 75 टक्के पेक्षा कमी नसावा.

पीएमईजीपी कर्ज खालील क्षेत्रातील उद्योगांसाठी दिले जाते :

१: कृषीविषयक आधारित अन्न प्रक्रिया
२: वन-आधारित उत्पादने
३: हाताने तयार केलेला कागद आणि फायबर
४: खनिज-आधारित उत्पादने
५: पॉलिमर आणि केमिकल-आधारित उत्पादने
६: ग्रामीण अभियांत्रिकी आणि बायो-टेक
७: सेवा आणि वस्त्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *