चिमूर क्रांती दिवसानिमित्त शहीदांना अभिवादन तसेच शहीद कुटुंबीयांचा गौरव मा.खा.डॉ. अशोकजी नेते चिमुर नगरपरिषद बैठकीच्या आढाव्या ला मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती..
Summary
चिमूर, दि. १६ ऑगस्ट २०२५ : १६ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या ऐतिहासिक स्वातंत्र्य क्रांती लढ्याच्या ८३व्या वर्धापन दिनानिमित्त आज चिमूर क्रांती दिनाचे औचित्य साधून शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. चिमूरच्या पावन भूमीत शहीद झालेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबीयांचा लोकप्रतिनिधी व […]
चिमूर, दि. १६ ऑगस्ट २०२५ :
१६ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या ऐतिहासिक स्वातंत्र्य क्रांती लढ्याच्या ८३व्या वर्धापन दिनानिमित्त आज चिमूर क्रांती दिनाचे औचित्य साधून शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. चिमूरच्या पावन भूमीत शहीद झालेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबीयांचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांना मानाचा मुजरा देण्यात आला.
या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोकजी उईके, चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मान. किर्ती कुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया, तसेच माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते हे मान्यवर विशेष उपस्थित होते.
शहीद कुटुंबीयांचा गौरव
मान्यवरांनी चिमूर शहरातील शहीद स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये –शहीद कठाणे कुटुंब,शहीद मिसार कुटुंब,शहीद वजरे कुटुंब (पार्वताबाई तुळशीराम वजरे यांच्या कुटुंबीयांचा सन्मान).
यावेळी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते शहीद वजरे कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मान्यवरांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
यानंतर नगरपरिषद चिमूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. अशोकजी उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा.खा. डॉ. अशोकजी नेते विशेष उपस्थित होते.
यावेळी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी शहीद वीरांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली. विशेषतः स्वातंत्र्याच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या बालक बालाजी रायपूरकर यांच्या स्मृतीस त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
ऐतिहासिक स्मरण १६ ऑगस्ट १९४२ रोजीच्या चिमूर क्रांतीत अनेक वीरांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. या लढ्यातील शौर्य व त्यागामुळे चिमूरला “चिमूर क्रांतीभूमी” म्हणून ओळख मिळाली. आजच्या कार्यक्रमात या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करून शहीदांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
“चिमूरच्या पावन भूमीतील शहीदांचा त्याग हा सदैव देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी भावना मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी प्रामुख्याने –राज्य परिषद सदस्य राजुभाऊ देवतळे, वसंतराव वारजुरकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. श्यामजी हटवादे,जेष्ठ नेते डॉ. दिलीप शिवरकर,माजी जि.प. उपाध्यक्ष कृष्णाभाऊ सहारे,तालुकाध्यक्ष राजु पा. झाडे,तालुकाध्यक्ष संतोष भाऊ रडके,सिडीसीसी बँकेचे संचालक गणेशभाऊ तडवेकर,आवेश पठाण, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष मनिष तुम्पलीवार,जेष्ठ नेते घनश्यामजी डुकरे,भाजयुमो तालुकाध्यक्ष बालुभाऊ पिसे,अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष कलिमभाई शेख,बालुभाऊ कोलते,पत्रकार चुनिलाल कुडवे, हरिश पिसे,मायाताई नन्नावरे, वर्षाताई शेंडे, भारतीताई गोडे
तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो. 7057785181
