स्वच्छतेकडून समृद्ध कडे अभियानाला नगर विकास विभागाचे गतीरोधक (स्पिडब्रेकर) नवगठित कोंढाळी नगर पंचायती स्वच्छते साठी कचरा गाड्या कधी मिळणार
कोंढाळी-
कोंढाळी नगरीची स्वच्छता धोक्यात सहा वार्डा साठी केवळ एकच कचरा गाडी
कोंढाळी सारख्या वीस हजार लोकसंख्या असलेल्या कोंढाळी नागर पंचायीतीच्या कचऱ्याची कचऱ्याची विल्हेवाट लावताना वेगवेगळ्या कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु आश्चर्याचे बाब म्हणजे कोंढाळी नगरीतील संपूर्ण कचऱ्याच्या संकलनासाठी नगरपंचायती कडे केवळ एकच कचरा गाडी आहे. संपूर्ण कचऱ्या संकलनासाठी नगरपंचायती कडे कचरा गाड्या कमी असल्याने नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी निर्माण होत आहेत .त्यामुळे प्रत्येक वार्डात एक कचऱ्या गाडी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ही मोहीम संपूर्ण देशभर राबवीला जात आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे या घोषवाक्याच्या आधारे कोंढाळी शहराची स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे ग्राम पंचायतीचे रचनेनुसार सहा वार्ड सदस्य संख्या १७ असून लोकसंख्या अंदाजे २०हजारा चे घरात आहे. दोन कचरा गाड्या होत्या दोन्ही कचरा
गाड्यातून प्रत्येक घरातील कचरा संकलन केला जायचा. नगर पंचायत गठित झाल्या नंतर दोन कचरा गाड्या पैकी एक कचरा गाडी बिघाडात आहे. तिच्या दुरूस्ती चे खर्च अव्वाचे सव्वा चे घरात जाते. या करीता एकाच कचरा गाडीतून कचरा संकलित केला जातो. ती कचरा गाडी ही बिघडल्यास नगरीचे सर्व प्रभागात कचर्याचे व दुर्गंधी पसरते. दोन वर्षाआधी नवगठित नगर पंचायत कोंढाळी मुलभूत तथा पायाभूत सुविधा व विकासासाठी आवश्यक निधी अभावी कोंढाळी चा विकास रखडला असून त्यात ही स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या बाबत शहरातील अनेक नागरिकांनी विकास निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नगर विकास विभागाकडे मागणी करून सुद्धा राज्य सरकार व नगर विकास प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. दरम्यान शहराची स्वच्छता हवी असल्यास प्रत्येक वर्डात एक कचरा गाडी फिरवणे आवश्यक असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. परंतु कोंढाळी नगरीत कचरा गाडी वाढवून कचरा संकलन करावा तसेच नगर पंचायती अंतर्गत मुख्य मार्ग,उप मार्ग, नाल्यांची सफाई, आठवडी व दैनिक बाजार स्वच्छता नियमित करण्यासाठी सफाई कामगार वाढविण्यासाठी ही मागणी पुढे आली आहे.
