BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

शिक्षक मेळाव्यापेक्षा चिंतन शिबिर घेण्यात यावे – आमदार चरणसिंग ठाकूर # मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Summary

प्रतिनिधी / २ मे काटोल – ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. याउलट इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडे पालकांचा कल वाढतो आहे. या परिस्थितीमुळे शिक्षणव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून, शिक्षकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्या हक्कासाठी आंदोलन […]

प्रतिनिधी / २ मे
काटोल – ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. याउलट इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडे पालकांचा कल वाढतो आहे. या परिस्थितीमुळे शिक्षणव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून, शिक्षकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याऐवजी शिक्षकांनी चिंतन शिबिरांचे आयोजन करून शाळेतील गुणवत्तेची वाढ, विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी नवकल्पनांची अंमलबजावणी, आणि पालकांशी सकारात्मक संवाद साधण्याचे धोरण आखावे, असे प्रतिपादन आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शिक्षक प्रशिक्षण सभागृह, काटोल येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत तालुकास्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चरणसिंग ठाकूर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सदस्य समीर उमप, माजी सभापती पं.स. काटोल संजय डांगोरे, उपसभापती निशिकांत नागमोते, पं.स. सदस्य अरुण उईके, पं.स. सदस्य लताताई धारपुरे, गटशिक्षणाधिकारी जावेद इकबाल, कृषी अधिकारी उत्तम झेलगोंदे, शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र बोढाळे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय चिखले उपस्थित होते.
तालुकास्तरीय गौरव पुरस्कारात स्थानिक स्वराज्य संस्था गटात, प्रथम क्रमांक: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आजनगाव, द्वितीय क्रमांक: पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढाळी, तृतीय क्रमांक: पीएम श्री नगरपरिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय काटोल तर खाजगी शाळा गटात प्रथम क्रमांक: ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेटपांजरा,द्वितीय क्रमांक: संत गजानन महाराज हायस्कूल, भोरगड, तृतीय क्रमांक: श्री उमप हायस्कूल लाडगाव यांना धनादेश, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
विभागीय स्तरावर लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी आणि जिल्हास्तरावर बि.आर,हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,काटोल व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कलंबा यांच्या निवडीबद्दल मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
पीएम ई विद्या व्हिडिओ निर्मिती पुरस्कार राजेंद्र टेकाडे व सोनाली चव्हाण यांना तर शैक्षणिक साहित्य निर्मिती पुरस्कार गंगाधर गायकवाड, सोनाली चव्हाण व हसीना शेख यांना प्रदान करण्यात आले. शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत विजेत्या ठरलेले रोशनी चरडे, सतीश ढबाले, रामेश्वर कुंभरे, दिलीप केने, रवींद्र पवार, जीवन भेलकर, अनिल देशभ्रतार , सचिन ठाकरे, सुनील सोलव यांना धनादेश,प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी जावेद इकबाल, सूत्रसंचालन राजेंद्र टेकाडे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र बोढाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख रमेश गाढवे, रमाताई धवड, विनोद वानखेडे, मनीषा बुचे, लता बालपांडे, अर्चना सोमनाथे, किशोर खडसे, मनोज नागमोते, अविनाश अकर्ते, शैलेजा नागपुरे, चेतन धापोडकर आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *