BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अवैध पशु तस्करी थांबणार तरी कधी भा ज पा शासीत राज्यांतून तस्करी व भा ज पा शासीत राज्यांतूनच परिवहन पशुधन तस्करीचे वहनाची कायमस्वरूपी जप्ती चां कायदा बनवा स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणा-यांवर धडक कार्यवाही

Summary

कोंढाळी -प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सरकार ने गोवंश हत्या बंदी कायदा पास केला आहे. तसेच पशुधनांची क्रूरपणे वाहतूकिचे कठोर नियम असून सुद्धा महाराष्ट्र राज्यातील उपराजधानी सह पुर्व विदर्भाती अनेक जिल्ह्यांतून तसेच महाराष्ट्र राज्याचे सीमे लगत चे मध्य प्रदेश, छत्तीसगड, तसेच हरियाणा […]

कोंढाळी -प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सरकार ने गोवंश हत्या बंदी कायदा पास केला आहे. तसेच पशुधनांची क्रूरपणे वाहतूकिचे कठोर नियम असून सुद्धा महाराष्ट्र राज्यातील उपराजधानी सह पुर्व विदर्भाती अनेक जिल्ह्यांतून तसेच महाराष्ट्र राज्याचे सीमे लगत चे मध्य प्रदेश, छत्तीसगड, तसेच हरियाणा , राजस्थान राज्यातून कंटेनर, ट्रक पिक अप मधे क्रूरपणे अत्यंत निर्दयपणे कोंबून राज्यातून अवैध पशू तस्करी व वाहतूक जोमात सुरू आहे. यात महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर महाराष्ट्र पोलीसां कडून कधी कधी कारवाई पण होत असते. पशुधन गोवंश किंवा अन्य पशुधन तस्करीचे वाहन पकडली की अनेकदा वाहनं चालक वाहन सोडून पळ काढतात , अवैध पशु वाहतूकीचे वाहन मालक किंवा अवैध पशु खरेदीदार पाच सहा दिवसांत संबंधित पोलीस स्टेशन ला वाहन चालकाला आनून पेश करतात. त्याची‌ लगेच जामीन होते. हे राज्यात रिजरोस पणे सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार ने कठोर कायद्यालाही न जुमानता अवैध पशुधन वाहतूक सुरूच आहे.
राज्य व केंद्र सरकार ने आता अवैध पशुधन तस्करीत वापरलेले वाहनाचा परवाना कायम स्वरुपी रद्द करण्यात यावा व संबंधित वाहनाची कायमस्वरूपी जत्पी सारखा कायदा बनविला जावा, तेंव्हाच संबंधित अवैध वाहतूक रोखण्यासाठी काही उपाय होऊ शकते. विषेश म्हणजे सध्या छत्तीसगड, मध्य प्रदेश राजस्थान, हरियाणा व महाराष्ट्रात भा ज पा शासित राज्य सरकार आहेत. व या राज्यातुन अवैध पशुधन तस्करीचे चे रैकेट सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यातील जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेने 14एप्रील रोजी हरियाणा राज्यातून पशुतस्करी चे वाहन पकडले आहे.

हकिकत याप्रमाणे आहे कि, दि 14/04/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक उपविभाग हिंगणघाट परीसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे कलोडे चौक हिंगणघाट येथे कंटेनर क्र. HR-73/B-0056 वर सापळा रचुन कार्यवाही केली असता, सदर कंटेनर मध्ये एकुण 53 म्हशीचे बछडे यांना ईजा होईल अशा पध्दतीने आखुड दोरीने बांधुन, कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रुरतेने डांबुन चारापाण्याची व वैद्यकीय अशी कोणतीही उपलब्धता न ठेवता, प्राण्यांची वाहतुक करण्याबाबतचे नियम व अटींचे पालन न करता, वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन 1) म्हशीचे नर जातीचे काळया रंगाचे एकुण 52 बछडे प्रती बछडा अंदाजे किं 20,000 रु. प्रमाणे अंदाजे एकुण किं 10,40,000 रू. 2) म्हशीचे मादि जातीची एक काळया रंगाची बछडी अंदाजे किं 20,000 रु. 3) आखुड दो-याचे एकुण 53 तुकडे प्रती तुकडा अंदाजे कि. 50 रू प्रमाणे किं 2,650 रू 4) एक 10 चक्का टाटा कंपनीचा कंटेनर क्र. HR-73/B-0056 कि. 30,00,000 रू असा ज.ुकि. 40,62,650 रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी नामे 1) नासिर जुबेर खान, वय 23 वर्ष, रा. घासेडा जि. नुह, हरियाणा, 2) जिलफान जुबेर खान, वय 20 वर्ष, रा. घासेडा जि. नुह, हरियाणा, 3) रजि जोसफ रजि, वय 53 वर्ष, रा. पिची, जि. त्रिशुल, केरळ 4) रिहान साफिक अली, वय 28 वर्ष, रा. बागपथ, उत्तर प्रदेश, 5) सादान साफिक अली, वय 20 वर्ष, रा. बागपथ उत्तर प्रदेश यांचेविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पशु सरंक्षण अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, 53 म्हशीचे बछडे त्यांच्या चारापाण्याच्या सोईकरीता व सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री गौरक्षण संस्था संत कबीर वार्ड हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. प्रकाश लसुंते, पो.अं. मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, विनोद कापसे, सुगम चौधरी, शुभम राउत सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *