बुरख्यात लपलेला नेता ओळखा .
या परिषदेला विफल करण्यासाठी चंद्रपूरातील आणि आंबेडकरी चळवळीतील एक महान आणि परमपूज्य नेते प्रयत्नरत होते . त्यांनी आमचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी घाईगडबडीत एक मोठा कार्यक्रम 12 दिवसापूर्वी जाहीर करून टाकला , लगेचच दुसऱ्या दिवशीपासून वर्गणी गोळा करण्यासाठी नेहमीच्या महिलांना फिरवीने सुरु केले . मग लोक त्यांना वर्गणी देतील , आम्हाला देतील की 14 एप्रिलच्या स्थानिक वार्डातील कार्यक्रमाला देतील हा ? हा पेच निर्माण करून या परमपूज्य नेत्याने आमचे कंबरडे मोडले . परंतु आज 13 दिवसानंतरही त्याच्या कार्यक्रमाचे कुठे नाव दिसत नाही . आम्ही मात्र सतर्क होऊन कार्यक्रमाच्या यशस्वितेकडे लक्ष केंद्रित केले . हेही या महामानवला कळले आणि त्याने अचानक म्हणजे 29 मार्च ला म्हणजे या परिषदेच्या उदघाटन सत्राच्या वेळेवर पुन्हा एका दुसऱ्या आयोजनासाठी , म्हणजे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी महामोर्चा आयोजित करण्यासाठी तातडीची मीटिंग बोलाविली , त्यात त्यांनी प्रत्येक वार्डातील बौद्ध मंडळ कमिटीला बोलाविले. म्हणजे परिषदेच्या उपस्थितीवरही परिणाम व्हावा , हा त्याचा प्रयत्न होता , तो किंचित सफल झाला , कारण उदघाटन सत्राला आम्हाला अपेक्षित उपस्थिती मिळाली नाही , परंतु नंतर दुपारनंतर संध्याकाळ पर्यंत गर्दी वाढत गेली, दुसऱ्या दिवशी तर सकाळपासूनच परिषदेला अपेक्षित गर्दी झाली .
आता या बाळबुद्धी परमपूज्य नेत्याची त्याने जाहीर केल्याप्रमाणे 14 एप्रिल पर्यंत एक 5 दिवसीय कार्यक्रम व 14 एप्रिल नंतर महामोर्चा असे दोन मोठे आयोजन यशस्वी करण्याची क्षमता आहे का की त्याने केवळ आम्हाला त्रास देण्यासाठी हे केले , हे आम्ही आणि आंबेडकरी समाज उघड्या डोळ्यांनी बघेल , त्याला आम्ही कुठलाही अडथळा आणणार नाही , हेही अभिवचन देतो . जयभिम !
