नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

शेतकऱ्यांच्या विकासासाठी पांदण रस्ते विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी राज्यातील समृद्धी मार्गाच्या धर्तीवर, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पीआरडीए (पांदण रस्ते विकास प्राधिकरण) स्थापन करावे

Summary

कोंढाळी – प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग-,नागपूर-गोवा शक्तीपीठ समृद्धी महामार्ग अत्याधुनिक सुविधांसह बांधला जात आहे. ही महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु शेतकऱ्यांच्या, विकास , उन्नती व समृद्धीसाठी राज्य सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समृद्धीचे (रस्ते बांधण्याचे) काम […]

कोंढाळी – प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग-,नागपूर-गोवा शक्तीपीठ समृद्धी महामार्ग अत्याधुनिक सुविधांसह बांधला जात आहे. ही महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु शेतकऱ्यांच्या, विकास , उन्नती व समृद्धीसाठी राज्य सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समृद्धीचे (रस्ते बांधण्याचे) काम अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पांदन रस्तेबांधणी ला गती मिळत नाही. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राज्य सरकार मार्फत
एम एम आर डी ए /एम एस आर डी ए या प्राधिकरणाच्या माध्यमातून, राष्ट्रीय महामार्ग,राज्य महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्गांवर विकास कामे करतात. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग मोकळा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी (पंधन रोड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PRDA)) सारखे प्राधिकरण स्थापन करावे. यामुळे शेतकरी समृद्ध होतील आणि राज्यासाठी ही अभिमानाची बाब होईल. असे निवेदन नागपूर जिल्हा संघटन मंत्री व कृषी मित्र दिनेश ठाकरे आणि जिल्हा मंत्री बाल किसन पालीवाल यांनी दिले आहे. दिनेश ठाकरे आणि बालकिशन पालीवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याकडे नागपूर जिल्ह्यासह राज्य पांदण रस्ते विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्याची आणि पांदण रस्त्यांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी करत यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी पांदण रस्ते विकास प्राधिकरण स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *