महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालयात हरित सेना व इको क्लबद्वारे वन्यजीव सप्ताह साजरा

Summary

सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे हरित सेना व इको क्लब द्वारे एक ते सात आक्टोंबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून हरित सेनेच्या व इको क्लबच्या विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताहाची माहिती देऊन महत्व […]

सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे हरित सेना व इको क्लब द्वारे एक ते सात आक्टोंबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून हरित सेनेच्या व इको क्लबच्या विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताहाची माहिती देऊन महत्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना स्थानिक वन्यजीवांची माहिती व्हावी म्हणून भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांची माहिती स्लाईट शोच्या माध्यमातून श्री ओ.डी.लांजेवार यांनी दिली. त्यामध्ये अस्वल, लांडगा, बिबट, वाघ, खवल्या मांजर, हरीण, रानडुक्कर, साळींदर, रानगवा, कोल्हा ,नीलगाय इत्यादी प्राण्यांची त्यांच्या वैशिष्ट्यासह माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमास प्राचार्य श्री जे.डी. पठाण उपप्राचार्य सौ.घाटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी एस.जी. राघोर्ते यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *