पळसगाव /कोलारी सरपंचासह पंचकमेटिने ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
Summary
भंडारा:- लाखनी तालुक्यातील पळसगाव कोलारी येथील स्थानिक स्वराज्य संस्था यांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यात यावी. याकरिता भंडारा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरद ईटवले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री […]
भंडारा:-
लाखनी तालुक्यातील पळसगाव कोलारी येथील स्थानिक स्वराज्य संस्था यांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यात यावी. याकरिता भंडारा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरद ईटवले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, व काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले,
यांना निवेदन देऊन दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत समस्या मार्गी लावण्यात याव्या. अन्यथा सरपंच संघटना च्या वतीने ग्रामपंचायतींना कुलूप लावून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला होता.
मात्र शासन प्रशासनाने या न्यायिक मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने लाखनी तालुक्यातील पळसगाव कोलारी येथील ग्रामपंचायत सरपंच सौ. वैशाली राज किशोर सुर्यवंशी व उपसरपंच रविंद्र जवंजार , संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, यांनी शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ ग्रामपंचायत ला कुलूप लाऊन आंदोलनात सहभागी झाले.
यामुळे ग्रामपंचायत चे कामकाज ठप्प झाले आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन मागण्यांची पूर्तता करावी..
