BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

खासदार संजय राऊत यांचे कोंढाळीत जंगी स्वागत २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचीच सरकार येणार!!!! अनिल देशमुख पुन्हा गृहमंत्री होणार!!!!!!

Summary

संजय राऊत कोंढाळी – शिवसेना (उ बा ठा) नेते व खासदार संजय राऊत नागपूर जिल्ह्यातील नागपूर अमरावती मार्गावरील खुर्सापार जवळील निर्मल सूतगिरणीला भेट दिली. निर्मल हे सूतगिरणीला जात असताना संजय राऊत यांच्यासोबत स्थानिक आमदार अनिल देशमुख ही होते. यावेळी खासदार […]

संजय राऊत
कोंढाळी – शिवसेना (उ बा ठा) नेते व खासदार संजय राऊत नागपूर जिल्ह्यातील नागपूर अमरावती मार्गावरील खुर्सापार जवळील निर्मल सूतगिरणीला भेट दिली. निर्मल हे सूतगिरणीला जात असताना संजय राऊत यांच्यासोबत स्थानिक आमदार अनिल देशमुख ही होते. यावेळी खासदार संजय राऊत व अनिल देशमुख यांचे कोंढाळी व काटोल येथील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कोढाळी येथील शेकडो नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या
आतिषबाजीत कोंढाळी वर्धा टी पॉइंट वर १८आगष्ट चे ११-३० वाजता भव्य स्वागत करण्यात आले.स्वागताला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारचा पराभव निश्चित आहे. राज्यात महाविकास आघाडी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्री केले जाणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महायुतीचे सर्वच घटक पक्ष अनिल देशमुख यांना विरोध करत आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सदैव अनिल देशमुख यांना आशिर्वाद दिला आहे. पुढे ही आपण आपला आशिर्वाद अनिल देशमुख यांचेवर असेलच. हे तुमच्या आजच्या स्वागताने दाखवून दिले आहे, की भविष्यातही आपण सर्व अनिल देशमुख यांचे सोबत असाल.. यावेळी आमदार अनिल देशमुख यांनीही महाविकास आघाडीच सरकार स्थापन करणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. खासदार संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कोंढाळी व काटोल येथील राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेस, शिवसेना (यू बा ठा), चे शेकाप, चे पदाधिकारी तसेच नागपूर जिल्हा परिषद ,काटोल पंचायत समिती, आणि ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी व कोंढाळी शहर व आसपासच्या गावातील शेकडो लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *