विषय- बृहन्मुंबई महापालिकेत कामगार/ कर्मचारी यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संघटनांना मान्यता देण्याबाबतच्या सुधारीत नियमावलीला विरोध असल्याबाबत …
Summary
प्रती, मा.महापालिका आयुक्त , बृहन्मुंबई महानगरपालिका , मुख्यालय ,मुंबई-४००००१. विषय- बृहन्मुंबई महापालिकेत कामगार/ कर्मचारी यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संघटनांना मान्यता देण्याबाबतच्या सुधारीत नियमावलीला विरोध असल्याबाबत … संदर्भः महानगरपालिका ठराव क्र.१४४४, दि.०१/०३/२०२४ महोदय, महानगरपालिकेच्या वरील संदर्भिय ठरावावुसार बृह्नमुंबई महानगरपालिकेतील कामगार/कर्मचार्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी […]
प्रती,
मा.महापालिका आयुक्त ,
बृहन्मुंबई महानगरपालिका ,
मुख्यालय ,मुंबई-४००००१.
विषय- बृहन्मुंबई महापालिकेत कामगार/ कर्मचारी यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संघटनांना मान्यता देण्याबाबतच्या सुधारीत नियमावलीला विरोध असल्याबाबत …
संदर्भः महानगरपालिका ठराव क्र.१४४४,
दि.०१/०३/२०२४
महोदय,
महानगरपालिकेच्या वरील संदर्भिय ठरावावुसार बृह्नमुंबई महानगरपालिकेतील कामगार/कर्मचार्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संघटनांना मान्यता देण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. तथापि,वरील सुधारणा करताना महापालिकेतील कोणत्याही मान्यताप्राप्त संघटनांना विश्वासात घेतले गेले नाही. संघटनांसोबत कोणत्याही प्रकारे चर्चा किंवा विचार-विमर्श न करता एकतर्फी तयार केल्या गेलेल्या वरील नियमावलीस आमच्या संघटनेचा तीव्र विरोध आहे.
मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था असुन,तीचे कामकाज स्वतंत्र नियमावलीनुसार चालते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विषयाबाबतची नियमावली/ कायद्यांचा दाखला देऊन पालिकेतील कामगार हित / हक्कांच्या विरोधात नियम तयार करणे उचित होणार नाही. कारण कामगार/कर्मचार्र्यांना भारतीय घटनेने बहाल केलेल्या मुलभूत अधिकारांना कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
महानगरपालिका व ईतर संविधानिक समित्या अस्तित्वात नसताना ‘प्रशासक’ म्हणुन प्राप्त अधिकारात पारित केलेल्या वरील ठरावाचा फेरविचार करावा ही नम्र विनंती.
आपला नम्र,
डॉ.संजय कांबळे- बापेरकर
सरचिटणीस
