कोंढाळी येथील ‘महेश’ नवमी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – वृक्षारोपण – ज्येष्ठ नागरिक व समाजसेवकांचा सत्कार समाजाच्या उन्नतीसह, महिलांना स्वावलंबी बनवा
Summary
कोंढाळी-प्रतिनिधी शनिवार, १५ जून रोजी कोंढाळी नगरितील लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात माहेश्वरी समाजाचे वतीने भगवान महेश नवमीनिमित्त राजूभाई लाखोटिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्यांनी भगवान महेश व सरस्वती चे प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर व महेश पूजन करण्यात आले.या प्रसंगी लाखोटिया […]
कोंढाळी-प्रतिनिधी
शनिवार, १५ जून रोजी कोंढाळी नगरितील लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात माहेश्वरी समाजाचे वतीने भगवान महेश नवमीनिमित्त राजूभाई लाखोटिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्यांनी भगवान महेश व सरस्वती चे प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर व महेश पूजन करण्यात आले.या प्रसंगी लाखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय संस्थेच्या उपाध्यक्षा रेखाताई राठी, लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर बुटे, ज्येष्ठ प्रतिनिधी बद्रीनारायण गांधी, बालकिसन पालीवाल, प्रा. सुभाष राठी,उद्योजक निमेश लद्धड, प्रभू दयाल शर्मा, नारायण पालीवाल, विजय कुमार मुंधडा आदींचे प्रमुख उपस्थित माहेश्वरी समाजाचे वरिष्ठ पदाधिकार्यांचे उपस्थित लाखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले, त्या नंतर माहेश्र्वरी समाजाचे बालकिसन पालीवाल, प्राचार्य सुधीर बुटे, विजयकुमार मुंधडा राजूभाई लखोटिया आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रा. दुर्गाताई भट्टड यांनी समाजाच्या विकास व उन्नतीसोबतच माहेश्वरी समाजाच्या कर्तृत्वाची आणि येथील माहेश्वरी बांधवांकडून होत असलेल्या सेवाभावी व सेवा कार्याचीही सर्वांना माहिती दिली. कोंढाळी माहेश्वरी महासभेचे सदस्य बाल किसन पालीवाल यांनी महेश नवमी महोत्सवानिमित्त आपल्या भाषणात सांगितले की, माहेश्वरी यांनी समाजाला असेच एकसंघ राहण्यास आवाहन केले. माहेश्वरी समाज बांधव सकारात्मक आणि सर्जनशील असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले. समाजाच्या उन्नतीसाठी वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवून समाजाला जोडण्याचा प्रयत्न करावे.माहेश्वरी महासभा सर्व संस्थांना सोबत घेऊन नवोपक्रमाने काम करेल आणि समाजाला नवी उंची देईल. त्यांनी कोंढाळीची संस्कृती, परंपरा, भाषा, चालीरीती तसेच येथील खाद्यपदार्थांचे कौतुक केले. माणसाची सेवा म्हणजे नारायणाची सेवा असे त्यांनी सर्वांना सांगितले. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन संस्थांनी केले. विजय कुमार मुंधडा यांनी समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी सर्व संघटनांसोबत एकजुटीने काम करण्याचे सांगितले. प्राचार्य सुधीर बुटे यांनी महेश नवमी महोत्सवानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी असलेले राजूभाई लाखोटिया यांनी समाजातील तरुणांना खेळातही प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखण्याबाबत सांगितले. कोंढाळी माहेश्वरी संघटनेकडून प्राचीन राम मंदिरापासून रोप रॅली घेऊन वृक्षारोपण स्थळी पोहोचली व माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ दाम्पत्य बद्रीनारायण गांधी व शांताबाई गांधी व माहेश्वरी समाजातील सर्व स्त्री-पुरुष युवकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावातील सकल माहेश्वरी व राजस्थानी परिवाराच्या उपस्थितीत श्री महेश भगवान वंशोत्पादन बाबद मार्गदर्शनानंतर माहेश्वरी समाजाचा महेश नवमीचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी महेश भगवान यांची पूजा करून आरती करण्यात आली .या प्रसंगी नागपुरवरून आलेले समाजाचे जिल्हाध्यक्ष, सचिव व संयोजक यांचा सत्कार करण्यात आले. लखोटिया भुतडा महाविद्यालयाच्या प्रांगणात समाजाचे ज्येष्ठ दाम्पत्य श्री.बद्रीनारायणजी गांधी व सौ. शांताबाई गांधी व महेश्वरी संघटनांचे महिला पुरूषांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .व त्यानंतर येथील प्रभू श्री राम मंदिरात श्री महेश भगवान यांच्या वंशपरंपरेसाठी मार्गदर्शन केल्यानंतर येथील सकल माहेश्वरी व राजस्थानी परिवाराचे जिल्हाध्यक्ष, सचिव व समन्वयक यांच्या उपस्थितीत महेश भगवान यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नागपुरातून आलेल्या समाजातील ज्येष्ठ दाम्पत्य, संयुक्त कुटुंब, वंशज आणि स्मशान सेवा स्वयंसेवक यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भगवान महेश नवमी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कोंढाळी येथील माहेश्वरी समाजातील सर्व महिला, पुरुष, युवक व युवतींनी परिश्रम घेतले, महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.