भंडारा महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये हे उपसरपंचपदी १० मतांनी जिंकले दिलीप पृथ्वीराज गजभिये यांना ९ मते मिळाल्याने वरठी येथील वर्तमान उपसरपंच सौ अनिताताई गजभिये

Summary

प्रतिनिधी वरठी           आज दिनांक ०५-१२-२०२३ रोजी वरठी ग्रामपंचायत मधून उपसरपंच निवडणुकीसाठी एकूण सात सदस्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ५ सदस्यांनी माघार घेतली. उरलेल्या दोन ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पदाचे उमेदवारांची नावे श्रीमती सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये […]

प्रतिनिधी वरठी
          आज दिनांक ०५-१२-२०२३ रोजी वरठी ग्रामपंचायत मधून उपसरपंच निवडणुकीसाठी एकूण सात सदस्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ५ सदस्यांनी माघार घेतली. उरलेल्या दोन ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पदाचे उमेदवारांची नावे श्रीमती सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये आणि मा. श्री. दिलीपभाऊ पृथ्वीराज गजभिये या दोन्ही उमेदवारांना ०९ – ०९ अशी समान मते पडल्याने वरठी ग्रामपंचायत येथील सरपंच मा. श्री. चांगदेवजी रघुते यांनी दहावे मत म्हणून मा. श्रीमती सौ. अनिता ताई गजभिये यांना दिले. परिणामतः एक मत जास्त मिळाल्याने वरठी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून मा. श्रीमती सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये हे निवडून आले आहेत. ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. दिलीप पृथ्वीराज गजभिये यांचा फक्त एक मताने पराभव झाला झाला असून सर्व ग्रामपंचायत सदस्य, जनतेचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांनी मा. श्रीमती सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये यांचे अभिनंदन केले आहे.
          तसेच पराभूत उमेदवार मा. श्री. दिलीपभाऊ पृथ्वीराज गजभिये यांनी सुद्धा विजयी उमेदवार मा. श्रीमती सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून भविष्यातील पुढील राजकीय कारकिर्दीतील सुलभतेने वाटचाल करण्याच्या हेतूने शुभेच्छा दिल्या आहेत.
            वरठी ग्रामपंचायत येथील सरपंच मा. श्री. चांगदेव रघुते यांनी सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून पुढील राजकीय कारकिर्दीतील वाटचाल सुलभतेने चालावी या हेतूने उपसरपंच मा. श्रीमती सौ. अनिताताई गजभिये यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंचायत समिती मोहाडी येथील सभापती मा. श्री. रीतेश भाऊ वासनिक यांनी देखील सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुमसर विधानसभेचे आमदार मा. श्री. राजुभाऊ कारेमोरे यांनी देखील मा. श्रीमती सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये यांना उपसरपंच म्हणून निवडून आल्याबद्दल फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *