महाप्रबोधन मेळावा व सत्कार समारंभ संपन्न…
श्री. राजकुमार खोब्रागडे
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर द्वारा स्नेहबंध सभागृह, सीएसटीपिएस ऊर्जानगर येथे महप्रबोधन मेळावा व सत्कार समारंभ रविवार ३ डिसेंबर,२०२३ ला संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. डॉ. संजय घोडके साहेब, उद्घाटक मान. शाम राठोड साहेब,प्रमुख मार्गदर्शक मान. एन. बी. जारोंडे साहेब, संजय मोरे साहेब, सूर्यकांत जनबंधू साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
जारोंडे साहेब यांनी पद्दोनतीमध्ये आरक्षण कोणासाठी आणि कशासाठी या विषयावर मार्गदर्शन केले. आणि आरक्षित वर्गामुळे कामकाजाची गुणवत्ता वाढते हे संशोधनाचा हवाला देऊन पटवून दिले.
तसेच उद्घाटक शाम राठोड साहेब यांनी सर्व मागासवर्गीय समाजानी एकत्र येऊन कामगाराच्या हिता करिता काम करावे असे सांगितले.
कार्यक्रमचे अध्यक्ष संजय घोडके साहेब यांनी देशातील आरक्षित कर्मचारी यांची सद्यस्थिती आणि संघटनेची भूमिका या वर भाष्य केले. खाजगीकरणमुळे आरक्षित कर्मचारी वर्गाला धोक्याचा इशारा आणि उपाय या वर भाष्य केले.
संघटनेतील निवृत्त कर्मचऱ्यांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. आणि चर्चासत्राद्वारे उपस्थितांचे प्रश्नाचे निवारण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शाखेचे
अध्यक्ष मा. नरेंद्र एन. डोंगरे, सचिव पंकज ज. दवाळे,कार्याध्यक्ष छोटेंद्र घायवन , कोषाध्यक्ष मा. प्रभाकर वाघमारे आणि सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
