BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

“वंचित बहुजन आघाड़ी तालुका चंद्रपुर आढावा व नियोजन बैठक संपन्न”

Summary

दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोज शुक्रवारला सायं ७:०० वाजता, वंचित बहुजन आघाड़ी तालुका जन संपर्क कार्यालय, ऊर्जानगर/दुर्गापुर येथे वंचित बहुजन आघाड़ी तालुका चंद्रपुरची मासिक आढावा व नियोजन बैठक मान. आयु. विनाश कातकर (चंद्रपूर तालुका कार्याध्यक्ष व माजी चंद्रपूर तालुकाध्यक्ष) यांचे […]

दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोज शुक्रवारला सायं ७:०० वाजता, वंचित बहुजन आघाड़ी तालुका जन संपर्क कार्यालय, ऊर्जानगर/दुर्गापुर येथे वंचित बहुजन आघाड़ी तालुका चंद्रपुरची मासिक आढावा व नियोजन बैठक मान. आयु. विनाश कातकर (चंद्रपूर तालुका कार्याध्यक्ष व माजी चंद्रपूर तालुकाध्यक्ष) यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली.
बैठकीचे संचालन चंद्रपूर तालुक्याचे महासचिव मान. प्रदिप पाटील यांनी केले. या बैठकीत गाव तिथे शाखा या प्रमाने संपुर्ण तालुका चंद्रपुर मध्ये वंचित बहुजन आघाड़ी ची शाखा स्थापण करणे, वंचित बहुजन आघाड़ी चे ध्येय धोरण समजवून सांगणे, गावकुशा बाहेरील समाजाच्या शेवटच्या व्येक्ती पर्यंत वंचित बहुजन आघाड़ी चा प्रचार-प्रसार करणे व वंचित बहुजन आघाड़ी चे सभासद वाढविणे इत्यादि प्रकारच्या विषयवार आढावा व नियोजन बैठकी मध्ये करण्यात आले.

ह्या प्रसंगी वंचित बहुजन आघाड़ी जिल्हा चंद्रपुर (पश्चिम) चे उपाध्यक्ष मान. एस.डी.सातकर हे प्रामुख्याने उपस्थित होते या सोबतच बैठकीला चंद्रपूर तालुक्याचे पदाधिकारी मान. विनाश कातकर(चंद्रपूर तालुका कार्याध्यक्ष), मान. दिगांबर दुर्योधन (चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष), डॉ. रॊशन अलोने (चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष), मान संजू बन्सोड (चंद्रपूर तालुका सहसचिव), मान दयाळ सहारे(चंद्रपूर तालुका कोषाध्यक्ष), मान अरुण निमगडे (चंद्रपूर तालुका सक्रिय सदस्य), मान. प्रदिप पाटील (चंद्रपूर तालुका महासचिव) आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार प्रदर्शन मान.संजू बन्सोड (चंद्रपूर तालुका सहसचिव) यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *