BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत आपरेशन वाश आऊट सव्वा लाखाचा मुद्दे माल जप्त महिला -पुरूष आरोपींतांना अटक कोंढाळी पोलीस व गुन्हेशाखेची कार्यवाही

Summary

कोंढाळी -वार्ताहर नागपूर जिल्हा(ग्रामीण) पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या आपरेशन वाश आऊट चे दरम्यान कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत चाकडोह,सोनमोह, व नांदोरा फाटा(कोंढाळी) येथे कोंढाळी पोलीस स्टेशन तसेच नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू निर्मिती व अवैध दारू विक्री करणाऱ्या एक […]

कोंढाळी -वार्ताहर
नागपूर जिल्हा(ग्रामीण) पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या आपरेशन वाश आऊट चे दरम्यान कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत चाकडोह,सोनमोह, व नांदोरा फाटा(कोंढाळी)
येथे कोंढाळी पोलीस स्टेशन तसेच नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू निर्मिती व अवैध दारू विक्री करणाऱ्या एक महिला व दोन पुषांनवर कार्यवाही करून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोंढाळी काटोल पोलीस स्टेशन च्या सीमेवरील कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या सोनमोह येथे कोंढाळी चे ठाणेदार पंकज वाघोडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल कामडी तसेच पोलिस हवालदार सुनिल ठोंबरे, महिला पोलिस शिपाई जया नेवारे व शिपाई प्रशांत काळे यांनी सोनमोह येथील मोहफूल दारू निर्मिती करण्यात येणाऱ्या दारू भट्टी वर धाड टाकून मोहफूल दारू निर्मिती ची १५०लिटर अवैध दारू जप्त केली तसेच पाच लोखंडी ड्रम सडवा नष्ट करून अवैध दारू निर्मिती करनारी (रीना जबाबसिंगपवार ३०रा सोनमोह) महिलेला ताब्यात घेतले व घटनास्थळावरून सत्तर हजार रूपयाचे किंमतचा मुद्धेमाल जप्त करण्यात आल्या, त्याच प्रमाणे चाकडोह येथील ज्ञानेश्वर घनशाम कुबडे(६५)रा. चाकडोह याचे हॉटेल वर ठाणेदार पंकज वाघोडे यांचे मार्गदर्शनाखली ए एस आय राजकुमार पोलीस हवालदार सुनिल ठोंबरे,शिपाई सुनिल मोरे यांनी धाड टाकून देशी दारू च्या १८०मि ग्राम च्या ०८ दारूच्या बाटल्या किंमत ८००रू जप्ती करण्यात आली तर तिसरी कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ संदिप पखाले,नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक ठाकूर,ए एस आय आशिष सिंह,ए एस आय चंद्रशेखर गडेकर,पोलीस हवालदार प्रमोद तभाने, हवालदार रणजीत जाधव यांनी नाके बंदी दरम्यान नांदोरा फाटा येथे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील सावळी सावळी येथील दादाराव शामराव ढोबाळे (३०)हा हिरो होंडा पैशन दुचाकी क्र एम एच -४० डी ३४५४ वर देशी दारू च्या ३००बाटल्या(टिल्लू) कोंढाळी येथील नवीन बाजारातील दारूच्या दुकानातून वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे कडे वाहून नेत असतानाच नागपूर (ग्रा)
गुन्हे शाखा पोलीस पथकाने दादाराव शामराव ढोबाळे याला ताब्यात घेतले दुचाकी सह ३००(टिल्लू)दारु बाटल्या एकूण सत्तेचाळीस हजाराचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.
कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत १७व १८ सप्टेंबर या दोन दिवसात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेतले व सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *