BREAKING NEWS:
नागपुर

महामार्गावरून धावनार्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्राव्हल्स ची कसून चौकशी सुरू खुर्सापार चेक पोस्ट कडून तपासणी

Summary

काटोल -प्रतिनीधी–दुर्गाप्रसाद पांडे       समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यात ट्रॅव्हल्स ला लागलेल्या भीषण आगीत 26 लोकांचा होरपळून मृत्यु झाल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस खुर्सापार च्या वतीने समृद्धी महामार्गावर तसेच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्स ची चेकिंग करून आपातकालीन परिस्थितीतील […]

काटोल -प्रतिनीधी–दुर्गाप्रसाद पांडे
      समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यात ट्रॅव्हल्स ला लागलेल्या भीषण आगीत 26 लोकांचा होरपळून मृत्यु झाल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस खुर्सापार च्या वतीने समृद्धी महामार्गावर तसेच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्स ची चेकिंग करून आपातकालीन परिस्थितीतील emergency डोअर सुस्थितीत आहे किंवा कसे? फायर extinguisher, फर्स्ट एड बॉक्स, इत्यादी बाबी आहे किंवा कसे याबाबत चेकिंग सुरू असून तसेच ट्रॅव्हल्स चालकाजवळ असलेला परवाना वैध आहे किंवा कसे.? याबाबत तपासणी सुरू केलेली आहे.. तसेच समृद्धी महामार्गावरून तसेच इतर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना समुपदेशन करून त्यांना सिटबेल्टचा वापर करणे,टायरमध्ये नायट्रोजन हवा भरणे, वाहनाचे टायर सुस्थितीत असणे, लाईट सुस्थितीत असणे,वाहन चालविताना योग्य लेन चा वापर करणे,इत्यादी बाबत जनजागृती सुरू आहे.
[ वरील प्रमाणे वाहतूक नियमांची जनजागृती रवींद्र कुमार सिंगल, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) म.रा. मुंबई,यशवंत सोळंके पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, प्रादेशिक नागपूर, वैशाली वैरागडे, पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. निलेश भिलावे, प्रभारी अधिकारी खुर्सापार, ASI दुधबर्वे, पो.हवा.मेहर, शेंद्रे, पो.ना.हरि ठाकुर,गुड्डू निखारे,आहाके, सोमकुवर हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *