वर्ग चार शिक्षक फक्त एक शतक झळकावणाऱ्या जिल्हा परिषद उर्दू शाळेसाठी शिक्षक मिळे ना……
वार्ताहर – कोंढाळी – दुर्गाप्रसाद पांडे
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जून १९२२ रोजी सुरू आज ही शिक्षण देत आहे. आज येथील उर्दू प्रायमरी शाळेला १०० वर्षे पूर्ण होऊन १०१व्या वर्षात पदार्पण केले आहे. वर्ष 2014 पर्यंत येथील उर्दू प्राथमिक शाळेतील अल्पसंख्येच्या विद्यार्थ्यांना चार नियमित शिक्षक शिकवत असत. 2014 नंतर एक एक शिक्षक निवृत्त होत गेले. आता 2021 पासून येथे केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर वर चार वर्ग असलेली उर्दू प्राथमिक शाळा सुरू आहे.
येथील शालेय व्यवस्थापन समिती ने ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींसह स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि .प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण सभापती, जि.प अध्यक्ष व आमदार आदींना निवेदन देण्यात आले. येथील उर्दू प्राथमिक शाळेसाठी शिक्षकाची मागणी करणाऱ्यात आली. तरीही आजतागायत रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्यात आलेली नाहीत.
वर्ष 2023-2024 चे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेतील आवश्यक रिक्त पदांची शिक्षकांची पदेही भरण्यात आली आहेत. असे असले तरी शंभर वर्षांपासून जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण देणाऱ्या कोंढाळी उर्दू प्राथमिक शाळेत दोन वर्षांपासून शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याकरिता सातत्याने मागणी करूनही जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी आवश्यक ती पूर्तता आजूनही झाली नाही. कोंढाळी उर्दू प्राथमिक शाळेकरिता रिक्त शिक्षकांची पद पुर्ती न होने हे शिक्षण विभाग व संबंधित लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कोंढाळी उर्दू प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती चे
अशपुद्दीन काझी, याकूब पठाण, अब्दुल रियाझ, रियाझुल हसनैन, सलीम शकील शेख, अब्दुल शकील, मोहम्मद बदरुज्जमा, नवशाद शेख, अल्बास अरिक शेख, शाझिया अन्वर शेख, नाझिमा परवीन शेख जाहिद, फरहीन अंजुम अहफाज अली, आणि अंजुम काझी या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी कोंढाळी उर्दू प्राथमिक शाळेसाठी आवश्यक शिक्षकांची पदे भरण्याची परत मागणी केली आहे. आता तरी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी (प्रा), सी इ ओ, व जि प अध्यक्ष यांनी या प्रकरणी लक्ष देऊन रिक्त पदे भरण्याकरिता आदेश देतील अशी अपेक्षा पालकांकडून करण्यात आली आहे.
