निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची किर्तन सेवा सदैव समाजप्रबोधनासाठीच – अनिल देशमुख हजारों भाविकांच्या उपस्थितीत इंदुरिकर महाराजांचे समाज प्रबोधन
कोंढाळी वार्ताहार-दुर्गाप्रसाद पांडे
ह भ प इंदुरिकर महाराज गेली अनेक वर्षापासून किर्तन रुपी सेवा करत असून त्यामधून महाराजांचा समाज प्रबोधनावर जास्तीचा भर देऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत असल्याचे मत राज्याचे माजी गृहमंत्री व काटोल चे आमदार अनिल देशमुख यांनी मिनिवाडा येथील सुप्रसिध्द विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाचे भव्य प्रांगणात आयोजित इंदुरिकर महाराज यांचे समाज प्रबोधनात्मक किर्तना चे प्रसंगी इंदुरिकर महाराज यांच्या सत्कार प्रसंगी यांनी व्यक्त केले
काटोल तालुक्यातील श्री क्षेत्र मिनिवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती व गावकर्यांच्या वतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 जून रोजी सायंकाळी पाच ते सात वाजता चे
दरम्यान राष्ट्रीय समाजप्रबोधनात्मक प्रख्यात किर्तनकार ह.भ. प. इंदोरीकर महाराज यांचे किर्तन सोहळ्या प्रसंगी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आपल्या समाज प्रबोधनातुन सांगितले की शासनाने 5 ते 12 शालेय शिक्षण अभ्यासक्रमात प्रत्येक वर्गात एक तरी संतांची शिकवण विचार शिकविले पाहिजे तसेच मोबाईल वापरावर सुद्धा प्रतिबंध असला पाहिजे व्यसनाधीनता ,आचार विचार आहार अशा विविध सामाजिक चालीरीती,परंपरा स संस्कृती,धर्म, ज्ञान, दया यावर समाज जागृती प्रबोधनातून विचार मांडले यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती चे आयोजक ह भ प नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनात विठ्ठल रुख्मिनी मंदिर कमिटीचे पदाधिकारी तथा गावकरी स्वयंसेवक युवक युवती, यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला या प्रसंगी माजीगृह मंत्रीअनिल देशमुख, सभापती संजय डांगोरे,जि प सदस्य सलीलदादा देशमुख ,माजी जि प उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले,जयंता टालातटूले व मोठ्या संख्येने-राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते, तसेच पंच क्रोशितील भाविक भक्त आणि ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी बापूसाहेब रोहम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पंकज वाघोडे यांनी कार्यक्रम स्थळी चौख बंदोबस्त ठेवला होता.
