BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १७५ तक्रारींचे निराकरण

Summary

मुंबई, दि. १९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मालाड वेस्ट पी नॉर्थ वॉर्ड येथे १३२ तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील १०० तक्रारी जागीच  निकाली काढण्यात आल्या. तसेच गोरेगाव वेस्ट पी साऊथ वॉर्ड […]

मुंबई, दि. १९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मालाड वेस्ट पी नॉर्थ वॉर्ड येथे १३२ तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील १०० तक्रारी जागीच  निकाली काढण्यात आल्या. तसेच गोरेगाव वेस्ट पी साऊथ वॉर्ड येथे ७५ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या  तसेच ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या देखील तातडीने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.या कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या  स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे.  हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत   दुपारी ३ ते ५.३० वाजता सुरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *