11 मे पारडसिंगा येथे मातेचे जन्मोत्सवाची सांगता विदर्भ व परप्रांतीय भक्त येणार निःशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माधव नेत्रालयाचे तज्ञ चमुद्वारे तपासणी
काटोल: -प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे
श्री सती अनुसया माता संस्थान पारडसिंगा येथील जन्मोत्सवाची सांगता गुरुवार दि 11 मे ला होत आहे.यानिमित्त विदर्भासह इतर प्रांतातील भक्त नेहमी प्रमाणे हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. यानिमित्त बुधवारला सायंकाळी मातेचा भव्य पालखी सोहळा उत्सहात पार पडला . नागपूर सह अनेक देवस्थान मधून आलेल्या दिंड्या पालखीत सहभागी झाल्या होते. सांगता समारोप सोहळ्यात सर्वधर्मीय सामूहिक सोहळा,हभप कनेरकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद भांडरा होणार असल्याचे आयोजन कमिटीने सांगितले. सप्तहात दैनिक रात्रीचे हभपसोपं महाराज शास्त्री हिंगोली,हभप नारायण पडोळे,हभप प्रल्हाद गौरखेडे महाराज यांचे कीर्तन व भागवत कथा प्रवक्ता हभप संदीप गिरी महाराज यांचे सुश्राव्य कथेचा लाभ भक्तांनी घेतला.
निशुल्क नेत्र तपासणी शिबीर
जन्मोत्सवात दिनाक 9 मे2023 रोज मंगळवार ला सकाळी 11 ते 4 या कालावधीत माधव नेत्रालय नागपूर व श्री सती अनसूया माता संस्थान पारडसिंगा यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे
लाभ शेकडो भक्तांनी घेतल्याचे संस्थांचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले.
शिबिरात माधव नेत्रालययाची तज्ञ चमू तपासणी मार्गदर्शन केले.शिबीर आयोजनास महेंद्र खंडाईत, दिवाकर सोमकुवर,वैभव विरखरे,
सुमित बबुटा, अमोल चोरे, व्यवस्थापक गवळी यांचे सहकार्य लाभले. सांगता समारोप कार्यक्रमात लाभ घेण्याचे आवहन संस्थेचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर व विश्वस्त मंडळाने केले आहे.

———
फोटो- पारडसिंगा नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेताना रुग्ण व वैद्यकीय तज्ञ मंडळी
