दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल पाटील म्हशाखेत्री.
दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली र. नं. ३०३ च्या अध्यक्षपदी अनिल जगन्नाथ म्हशाखेत्री, उपाध्यक्षपदी श्रीमती सुमतीताई तेजराम मुनघाटे तर मानद सचिव पदी श्रीमती सुलोचना खुशालराव वाघरे यांची बिनविरोध सन 2022- 23 ते 2027-28 या कालावधीसाठी नुकतीच निवड झाली. सदर निवडणूक पतसंस्थेच्या सभागृहात घेण्यात आली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाचे अधिकारी व्ही. पी. सहारे यांनी काम पाहिले.
दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली र. नं. ३o३ या संस्थेची सन 2022- 23 ते 2027- 28 या कालावधीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 21 मार्च 2023 रोजी सहकार विभागाने जाहीर केला होता यात सर्वसाधारण मतदारसंघातून अनिल जगन्नाथ म्हशाखेत्री, मधुकर जागोबाजी कोटगले, दिलीप कृष्णाजी उरकुडे, मुकुंद पांडुरंग म्हशाखेत्री, पंडितराव तेजूजी पुडके, दिलीप यादवराव खेवले, पवन चुडाराम मुनघाटे, संध्या देवराव खेवले , अनुसूचित जाती/ जमाती मतदारसंघातून कृष्णा यादव दुधे, इतर मागासवर्ग प्रवर्ग मतदार संघातून शेषराव नामदेवराव येलेकर, भटक्या विमुक्त जाती/ जमाती गटातून किशोर कवडूजी मडावी, महिला प्रवर्गातून श्रीमती सुमतीबाई तेजराम मुनघाटे व श्रीमती सुलोचना खुशालराव वाघरे हे बिनविरोध संचालक पदी निवडून आले होते.
यावेळी अध्यक्षपदी अनिल पाटील म्हशाखेत्री, उपाध्यक्षपदी श्रीमती सुमतीबाई तेजराम मुनघाटे व मानद सचिव पदी श्रीमती सुलोचना खुशालराव वाघरे हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल सर्व संचालक, शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या वतीने संस्थेच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. शेषराव येलेकर
. सह. संपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
